नवी दिल्ली : क्रिकेटचे नियम तसे सोपे आहेत मात्र नव्या नियमांची माहिती नसल्यास ते अनेकदा क्रिकेटर्सना भारी पडते. अंडर १९ वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका यांच्यात खेळवलेल्या सामन्यामध्ये असेच काहीसे घडले. नियम माहीत नसल्याने आफ्रिकेच्या एका फलंदाजांला आपली विकेट गमवावी लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी त्याला बाद घोषित करण्यात आलेय. ही घटना द.आफ्रिका फलंदाजी करत असताना १७व्या ओव्हरमध्ये घडली. जीवेशन पिल्ले फलंदाजी करत होता. 


वेस्ट इंडिजचा होयट गोलंदाजी करत होता. यावेळी होयटच्या चेंडूवर पिल्लेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू स्टम्पकडे जात असताना फलंदाजाने त्याला रोखले. इथपर्यंत ठीक होते. मात्र त्याने अनावधानाने चेंडू हातात घेत तो विकेटकीपरला परत केला. वेस्ट इंडिजचा कर्णधार इमॅन्युअल स्टीवर्टने या चुकीचा फायदा उठवला. स्टीवर्टने यासाठी फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी अपील केले. यानंतर अंपायरने त्याला बाद घोषित केले. 



 


सगळेच झाले हैराण


पिल्लेला अशा प्रकारे बाद घोषित केल्याने मैदानातील सर्वच प्रेक्षक हैराण झाले. आयसीसीच्या नव्या नियमानुसार त्याला बाद घोषित करण्यात आले. आयसीसीच्या नियम ३७.४ नुसार जर एखादा फलंदाज गोलंदाज अथवा फिल्डरच्या परवानगीशिवाय चेंडू बॅट अथवा शरीराच्या कोणत्याही भागाचा वापर करुन परत देत असेल तर त्याला फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी बाद घोषित केले जाऊ शकते. त्यामुळे पिल्लेला बाद घोषित करण्यात आले.