जमैका : वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर ओशेन थॉमस अपघातामध्ये जखमी झाला आहे. रविवारी जमैकामध्ये हायवे २००० ओल्ड हार्बरवर थॉमसच्या गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिली. या धडकेमध्ये ओशेन थॉमसची गाडी उलटी झाली. गंभीर दुखापतीपासून थॉमस थोडक्यात बचावला. अपघातानंतर थॉमसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थॉमसला आता रुग्णालयातून सोडून देण्यात आलं असलं, तरी तो घरी विश्रांती घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमैकाच्या स्पॅनिश टाऊन हॉस्पिटलमध्ये ओशेन थॉमसवर उपचार करण्यात आले. स्कॅनिंग केल्यानंतर थॉमसला सोडून देण्यात आलं. ओशेन थॉमस वेस्ट इंडिजकडून २० वनडे आणि १० टी-२० मॅच खेळला आहे. पुढच्या महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या ३ वनडे मॅचच्या सीरिजसाठी ओशेन थॉमसची वेस्ट इंडिजच्या टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.



श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्येही थॉमसला संधी मिळाली नाही, तर तो थेट आयपीएलमध्येच दिसेल. आयपीएलमध्ये राजस्थानच्या टीमने थॉमसला लिलावात १.५० कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. थॉमसने राजस्थानकडून खेळताना ४ मॅचमध्ये ५ विकेट घेतल्या आहेत.