IND vs WI ODI Series: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना बार्बाडोस येथे होणार आहे. अशातच आता वनडे सामन्यांसाठी वेस्ट इंडिजने 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. वेस्ट इंडिजने यावेळी अशा दोन खेळाडूंना संधी दिलीये, जे भारतीय गोलंदाजांना सुळो की पळो करू शकतात. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाई होप (Shai Hope) यंदा वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार असेल. स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस (Oshane Thomas) यांनी दीर्घ काळानंतर टीममध्ये पुनरागमन केलंय. हेटमायर (Shimron Hetmyer) वेस्ट इंडिजकडून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप वनडे वर्ल्ड कप पात्रता फेरीचा भाग देखील बनू शकला नाही. मात्र, आता दोन्ही खेळाडूंची संघात एन्ट्री झाल्याने आता वेस्ट इंडिजची ताकद आणखी वाढली आहे.


दुसरीकडे टीम इंडियामध्ये हार्दिक पांड्याचं कमबॅक झालंय. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांच्यामुळे संघाची ताकद वाढलीये, तर उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


आणखी वाचा - IND vs WI: ना रोहितला जमलं ना विराटला, पण आश्विनने करून दाखवलं!


भारताविरुद्ध वेस्ट इंडिजचा वनडे संघ:


शाई होप (कर्णधार), रोवमन पॉवेल (उप-कर्णधार), अॅलिक अथानाझ, यानिक कारिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटी, जॅडन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केव्हिन सिनियर, केव्हिन सील्स.



एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (IND vs WI ODI Schedule)


पहिली वनडे, 27 जुलै, बार्बाडोस  (IND vs WI 1st ODI)
दुसरी वनडे, 29 जुलै, बार्बाडोस  (IND vs WI 2nd ODI)
तिसरी वनडे, 1 ऑगस्ट, त्रिनिदाद  (IND vs WI 3rd ODI)


एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ:


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, आर जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.