ENG vs WI ODI : जुन्यांना डच्चू, नव्या छाव्यांना संधी! इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संघाची घोषणा!
West Indies squad for England : वेस्ट इंडिजने पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या वनडे सामन्यांसाठी टीमची घोषणा केली आहे.वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दोन खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
West Indies vs England ODIs : निराशाजनक कामगिरीनंतर आता वेस्ट इंडिज (West Indies) संघाने तडकाफडकी मोठे निर्णय घेतले आहेत. खराब प्रदर्शनामुळे वेस्ट इंडिज संघाला यंदा वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) देखील जागा मिळवता आली नव्हती. दोन वेळच्या वर्ल्ड कप चॅम्पियन वेस्ट इंडिजवर अशी वेळ पहिल्यांदाच आली होती. अशातच आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दोन खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर इंग्लंड दौऱ्यासाठी (ENG vs WI ODIs) नव्या छाव्यांना संधी दिली आहे.
वेस्ट इंडिजने पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या वनडे सामन्यांसाठी टीमची घोषणा (West Indies squad for England) केली आहे. सोमवारी 15 जणांच्या संघात अनकॅप्ड अष्टपैलू शेरफेन रदरफोर्ड आणि मॅथ्यू फोर्ड यांची निवड केली गेली. तर जेसन होल्डर आणि निकोलस पूरन यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अष्टपैलू जस्टिन ग्रीव्हज जखमी असल्याने त्याला देखील संघात स्थान देण्यात आलं नाही.
शाई होपच्या नेतृत्वाखालील संघ 3 आणि 6 डिसेंबरला अँटिग्वामध्ये आणि 9 डिसेंबरला बार्बाडोसमध्ये इंग्लंडचा (ENG vs WI ODIs) सामना करेल. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड पाच टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळे आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज तयारी करत असल्याचं स्पष्ट होत आहे.
West Indies squad : शाई होप (कर्णधार), अलिक अथनाझे, यानिक कॅरिया, केसी कार्टी, रोस्टन चेस, शेन डॉवरिच, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोटी, केजॉर्न ओटली, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, ओशाने थॉमस.
आणखीू वाचा - रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' तीन नावांची चर्चा
दरम्यान, टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) वेस्ट इंडीज आणि अमेरिका या देशांमध्ये खेळवली जाईल. या टी-ट्वेंटी विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. टी-ट्वेंटी विश्वचषकचे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, आत्तापासून सर्व संघ तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय.