T20 World Cup : ऑस्ट्रेलियात (australia) होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला (ICC Men's T20 World Cup) दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत अनेक खेळाडू दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असून विश्वचषकाचा भाग होण्यासाठी मेहनत घेत आहेत, तर काही खेळाडू विश्वचषकापूर्वीच दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र, वेस्ट इंडिज (west indies) क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (West Indies star batsman Shimron Hetmyer has been dropped from the T20 World Cup)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेळेवर विमानतळावर (Airport) न पोहोचणं वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरला (Shimron Hetmyer) चांगलेच महागात पडलं आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने शिमरॉन हेटमायर टी-20 विश्वचषक संघातून वगळले आहे. तसेच त्याच्या जागी शेमार ब्रुक्सला संघात स्थान देण्यात आले आहे.


वेस्ट इंडिज संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायरला टी-20 विश्वचषकातून बाहेर करण्यात आलं आहे. विमानतळावर पोहोचायला झाल्यामुळे बोर्डाने कठोर निर्णय घेत त्याला टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळले आहे.


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघात शिमरॉन हेटमायरच्या जागी फलंदाज शामर ब्रूक्सच्या जागी स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सोमवारी ही घोषणा केली.


हेटमायरसाठी आधीच दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आला होता. 1 ऑक्टोबरला तो संघासह ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होता. हेटमायरने कौटुंबिक कारणास्तव दोन दिवसांची सुट्टी मागितली होती. यामुळे 3 ऑक्टोबरला तो विमानाने जाणार होता. यावेळी तो वेळेवर विमानतळावर पोहोचू शकला नाही. यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड नाराज झाले. त्याने हेटमायरला संघातून काढून टाकले.


बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, "शिमरॉन हेटमायरने ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी फ्लाइट चुकवल्यानंतर CWI निवड समितीने हा निर्णय घेतला आहे."