हा `नो बॉल` ठरला `नो बॉल ऑफ द सेच्युरी`
हा प्रकार वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान घडला.
मुंबई: ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने टाकलेला बहुचर्चित नो बॉल आपण गेल्या वर्षी पाहिला असेलच. पण, आता पु्न्हा एकदा एक असा बॉल टाकला गेला आहे. जो क्रिकेट इतिहासातील 'नो बॉल ऑफ द सेच्युरी' म्हणून ओळखला जात आहे. हा बॉल वेस्ट इंडिजचा डवखूरा मध्यमगती गोलंदाज शेल्डन कॉटरेल याने फेकला आहे. हा बॉल इतका वेगळा होता की, तो शेल्डनच्या हातातून सुटल्यावर थेट सेंकड स्लिपवर उभ्या असलेल्या खेळाडूपासूनही दूर गेला. हा बॉल टाकल्यामुळे सोशल मीडियावर कॉटरेलची नेटीझन्सनी चांगलीच खिल्ली उडवली.
षटकातील पाचवा चेंडू निसटला
हा प्रकार वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान घडला. शेल्डन कॉटरेल वेस्टइंडिजकडून पहिलेच षटक टाकून सामन्याची सुरूवात करत होता. दरम्यान, षटकातील चार बॉल त्याने नेहमीप्रमाणे टाकले. पण, पाचवा बॉल मात्र, त्याच्या हातून निसटला आणि पिचपासून दूर निघून गेला. सध्या बांग्लादेशचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय सामना मालिका पार पडली. जी बांग्लादेशने २-१ने जिंकली. आता दोन्ही संघांचा सामना टी-२० मालिकेत होईल.
वेस्ट इंडिजकडून टी-२०साठी संघाची घोषणा
टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणाही झाली आहे. यात चाडविक वाल्टन आणि शेल्डन कॉटरेल यांची वेस्ट इंडीज टी-२० मालिकेच्या संघात निवड झाली आहे. तर, प्रसिद्ध गोलंदाज ख्रिस गेल याला विश्रांती देण्यात आली आहे. गेल बांग्लादेशसोबत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामना मालिकेत सहभागी होते.
वेस्ट इंडिज टी-२० संघ
कार्लोस ब्राथवॅट (कर्णधार), सॅम्युएल बद्री, शेल्डन कॉटरेल, आंद्रे फ्लेचर, एविन लेविस, अॅश्ले नर्स, किमो पॉल, रोवमान पॉवेल, दिनेश रामदिन(विकेटकीपर), आंद्रे रसेल, मार्लोन सॅम्युएल, चाडविक शेल्डन आणि केसरिक विल्यम्स.