पोर्ट ऑफ स्पेन : भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजा कर्णधार जेसन होल्डरने टॉस जिंकला आहे. होल्डरने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारताने एक बदल केला आहे. कुलदीप यादवच्याऐवजी युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. तर वेस्ट इंडिजने त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले आहेत. शेल्डन कॉट्रेलच्याऐवजी किमो पॉल आणि ओशेन थॉमसच्याऐवजी फॅबियन एलनला संधी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया १-०ने पुढे आहे. पहिली वनडे पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला होता. त्यामुळे ही मॅच जिंकून सीरिज खिशात टाकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. वनडे सीरिजआधी झालेल्या टी-२० सीरिजमध्येही भारताचा ३-०ने विजय झाला होता.


वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅट्समन क्रिस गेलचा हा शेवटचा सामना असेल, त्यामुळे गेलला अलविदा करण्यासाठी मॅच जिंकण्याचा वेस्ट इंडिजचा मानस असेल. भारतासाठी शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. तर श्रेयस अय्यरने मागच्या मॅचमध्ये केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे विराटची मधल्या फळीतली चिंता थोडीफार मिटली असेल.


भारतीय टीम


रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, खलील अहमद


वेस्ट इंडिजची टीम 


क्रिस गेल, एव्हिन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलास पूरन, रोस्टन चेस, जेसन होल्डर, कार्लोस ब्रॅथवेट, फॅबियन एलन, कीमो पॉल, केमार रोच