किंगस्टन : वेस्ट इंडिजचा सलामीवीरर एव्हिन लुईसच्या वादळासमोर भारताचा एकमेव टी-२० लढतीत टिकाव लागू शकला नाही. लुईसने केलेल्या १२५ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारतावर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजने टॉस जिंकताना भारताला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात १९० धावा केल्या. त्यानंतर गेल आणि लुईसने जबरदस्त सुरुवात केली. 


गेल १८ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर मात्र लुईसने धावांची टांकसाळ उघडली. त्याने ६२ चेंडूत ६ चौकार आणि १२ षटकारांच्या सहाय्याने १२५ धावा तडकावल्या. 


मार्लन सॅम्युअल्सने ३६ धावा केल्या. भारताकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ३९ धावा केल्या. एविन लुईसला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.