Wrestlers Protest At Jantar Mantar: देश पातळीवरील दिग्गज कुस्तीपटूंनी बुधवारी जंतरमंतर येथे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तसेच भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत. भारतीय कुस्ती महासंघातील खेळाडू सध्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत असल्याचं पहायला मिळतंय. यामध्ये बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik) यांच्यासह विनेश फोगाटचा (Vinesh Phogat) देखील सहभाग आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप (Sexually Harassed) केल्यानो मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या खासगी आयुष्यात कुस्ती फेडरेशन ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला त्रास दिला जातोय, तसेच आमचा छळ होतोय, त्याचबरोबर आम्हाला धमक्या देखील जात आहेत, असा आरोप भारतीय कुस्तीपटूंकडून केला जातोय. त्यामुळे सध्या मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. (WFI president Brij Bhushan Sharan Singh has sexually harassed so many girls alleged by Vinesh Phogat Sakshi Malik protest at jantarmantar )


आणखी वाचा - Video | बृजभूषणशरण सिंह आक्रमक! राज ठाकरे यांच्यावर पुन्हा प्रहार


कुस्ती फेडरेशनचे विशेष प्रशिक्षक (WFI Coach) आमच्यावर अत्याचार करतात. राष्ट्रीय शिबिरात महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केलं जातं, त्यानंतर तक्रार करूनही कारवाई होत नाही, असा गंभीर आरोप करण्यात आलाय. टोकियो ऑलिम्पिकनंतर आम्ही पंतप्रधानांकडे (PM Narendra Modi) तक्रार केली होती, त्यांनी काही होणार नाही, असं आश्वासन देण्यात आलं होतं, असंही कुस्तीपटू सांगत आहेत.



दरम्यान, कधीही नियम बनवले जातात आणि खेळाडूंवर लादले जातात, असं बजरंग पुनिया म्हणाला आहे. तर खुद्द फेडरेशनच्या अध्यक्षांनीच (WFI president Brij Bhushan Sharan Singh) अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप विनेश फोगाटने केला आहे. त्यामुळे आता देशभर हा मुद्दा गाजत असल्याचं पहायला मिळतंय.