ऑस्ट्रेलिया : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिेका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. 26 डिसेंबरला सुरु होणारा हा कसोटी सामना बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखला जातो. मात्र बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे नेमकं काय? का म्हणतात याला बॉक्सिंग डे कसोटी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत, बॉक्सिंग डे टेस्ट 26 डिसेंबरला आणि न्यू ईयर टेस्ट मॅच 2 किंवा 3 जानेवारीपासून खेळली जाते. ही अशी परंपरा आहे.


या वर्षीही 'बॉक्सिंग डे'ला ऑस्ट्रेलियाचा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर इंग्लंडशी होणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियासोबत 3 कसोटी सामने खेळायचे आहेत.


कसोटी क्रिकेटमध्ये हे दोन्ही कसोटी सामने खूप महत्त्वाचे मानले जातात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांसारखे देश दरवर्षी बॉक्सिंग डे कसोटीने त्यांचं वर्ष संपवण्याचा आणि नवीन वर्षाची सुरुवात न्यू ईयर टेस्टने करण्याचा प्रयत्न करतात.


बॉक्सिंग डे हा केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नाही, ख्रिसमसनंतर कॉमनवेल्थ देशांमध्ये याला खास मानलं जातं.


का साजला केला जातो बॉक्सिंग डे?


25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे म्हणतात. यामागे काही खास कारणंही आहेत. ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांना आणि गरजूंना गिफ्ट देऊन आनंद साजरा करतात. यामुळेच ख्रिसमसच्या नंतरचा दिवस बॉक्सिंग डे म्हणून मानला जातो.


क्रिकेटमधील पहिला बॉक्सिंग डे सामना 1892 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदाना खेळला गेला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची कसोटी मालिका देखील बॉक्सिंग डेपासून म्हणजेच 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत पहिली मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.