मुंबई : क्रिकेट हा खेळाडूंचा खेळ समजला जातो. पण खेळाडूंव्यतिरिक्त अजून व्यक्ती असतात जे क्रिकेटच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे व्यक्ती म्हणजे अंपायर. अंपयारच्या अनेक चुकीच्या आणि बरोबर निर्णयामुळे सामन्याचं पूर्ण चित्र पालटतं. आयपीएल तोंडावर आहे आणि आता यामध्येही अंपायरची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र आयपीएलसाठी नेमकी कशा प्रकारे अंपायर्सची निवड केली जाते हे तुम्हाला माहित आहे का?


अंपायर बनण्याची योग्यता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंपायर बनण्यासाठी क्रिकेटचा नियम 42 माहित असणं पार गरजेचं आहे. त्याचसोबत क्रिकेटची चांगली माहितीही असावी लागते. इतकंच नव्हे तर अंपायरची वर्तणूकही या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते.


अंपायर बनण्यासाठी परीक्षा


अंपायर होण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा संस्थांकडून वेळोवेळी प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेण्यात येतात. जर एखादी व्यक्ती ही चाचणी उत्तीर्ण झाली, तर तो बीसीसीआयद्वारे आयोजित केलेल्या अंपायरच्या परीक्षेत बसण्यास पात्र मानला जातो.


जर एखादी व्यक्ती ही दुसऱ्या स्तराची चाचणी उत्तीर्ण झाली तर त्या व्यक्तीची बीसीसीआय पॅनेलसाठी निवड केली जाते आणि काही दिवस राष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केल्यानंतर त्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याची संधी देण्यात येते.