नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेत आहे. कधी हेअर स्टाईल तर कधी फटकेबाजीमुळे तो चर्चेत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. ही बातमी आहे न्यूझीलंड विरूद्धच्या एका सामन्यादरम्यान अंपायरने पांड्यावर हात उगारला होता. 


जर तुम्ही न्यूझीलंड आणि भारत यांच्यात खेळला गेलेला दुस-या वनडे सामना पुन्हा पाहिला तर हे तुमच्या लक्षात येईल. यात अंपायर पांड्यावर हात उगारताना दिसत आहे. भारताच्या इनिंगच्या ३३व्या ओव्हरमध्ये हे बघायला मिळेल. सध्या त्याने श्रीलंके विरूद्धच्या सीरिज विश्रांती घेतली आहे. 



अशात हार्दिक पांड्याचे काही मजेदार फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यात अंपायर पांड्यावर हात उगारताना दिसत आहे. पांड्यासोबत मैदानात दिनेश कार्तिक उभा होता. ड्रिंक्स ब्रेकनंतर हे समजत नव्हतं की स्ट्राईक कोण घेणार. पांड्याला स्ट्राईक घ्यायची होती, पण ते लक्ष देत नव्हता. 



अशात अंपायर रॉड टकरने असे संकेत दिले की ते पांड्याला मारणार आहेत. हे सगळं गमतीत होत होतं आणि प्रेक्षक आनंद घेत होते.