जेव्हा सचिन सेहवागवर भडकला, म्हणाला मूर्खपणा करू नकोस
सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागच्या जोडीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमी पार्टनरशीप केल्या आहेत.
मुंबई : सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागच्या जोडीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमी पार्टनरशीप केल्या आहेत. पण सचिन तेंडुलकर मैदानातच विरेंद्र सेहवागवर भडकला होता. याबाबतचा किस्सा खुद्द विरेंद्र सेहवागनं सांगितला आहे.
२०११ साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी ओपनिंग करताना सेहवागनं केलेल्या हरकतींमुळे कधीही न भडकणाऱ्या सचिनं रौद्ररुप दाखवलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही दोघं ओपनिंगला बॅटिंग करत होतो. पण माझं लक्ष बॅटिंगवर केंद्रीत होत नव्हतं, म्हणून मी गाणी म्हणायला सुरुवात केली. गाणी म्हणायला लागल्यावर मी पहिली ओव्हर खेळली आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली, असं सेहवाग म्हणालाय.
पहिल्या ओव्हरनंतर सचिननं मला गाणी म्हणू नकोस असं सांगितलं पण त्याचं न ऐकता मी चार-पाच ओव्हरपर्यंत गाणी म्हणत राहिलो. त्यामुळे सचिन भडकला आणि मुर्खपणा करू नकोस, माझ्याशी बोल, असं सचिन म्हणाल्याचं सेहवागनं सांगितलं. गाणी म्हणल्यामुळे माझी बॅटिंग चांगली होत आहे, अस मी सचिनला सांगितलं आणि गाणी म्हणतच राहिलो. यानंतर मात्र सचिन खूप भडकला आणि त्यानं मला सुनावलं, अशी आठवण सेहवागनं शेअर केली आहे.