मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचे चोहते जगभरात आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोघं एकमेकांचे खूप मोठा प्रशंसक आहेत. मात्र एक वेळ अशी होती की, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar)याच्या एका कृतीमुळे त्याला लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. (When Sachin Tendulkar had felt Shame in front of Amitabh Bachchan because of his Son Arjun Tendulkar ) ही गोष्ट एकदा स्वतः सचिनने 2017 साली अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसादिवशी सांगितलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक जाहिरात शूट करत होता. शूटवर त्यावेळी सचिन यांच्यासोबत मुलगा अर्जुन देखील होता. अर्जुन तेव्हा दीड वर्षांचा होता. आणि तो सचिनच्या मांडीवर बसून मोसंबी खात होता. 



शूटचं काम सुरू असल्यामुळे सचिन आणि अमिताभ एकत्र बसले होते. तेव्हा अर्जुनने मोसंबी खाता खाता अमिताभ बच्चन यांच्या कुर्त्याला हात पुसले. हे पाहाताच सचिनला समजलंच नाही की आता काय करायचं. सचिनला त्यावेळी खूप लाजीरवाणं वाटलं. 



अमिताभ यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे अतिशय मजेशीरपणे पाहिलं. पण तरीदेखील सचिनला या प्रसंगाला कसं सामोरं जावं हेच कळत नव्हतं.