जेव्हा इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने जडेला म्हटलं `आज रात्री मी आणि तू?`
आयसीसी महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला 9 रनने हरवलं. भारताच्या या पराभवानंतर भारतीय चाहत्यांमध्ये थोडी निराशा होती. विजयानंतर इंग्लंडची विकेटकीपर सारा टेलर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली होती.
मुंबई : आयसीसी महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला 9 रनने हरवलं. भारताच्या या पराभवानंतर भारतीय चाहत्यांमध्ये थोडी निराशा होती. विजयानंतर इंग्लंडची विकेटकीपर सारा टेलर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली होती.
साराने टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाबाबत एक ट्विट केलं होतं. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. २०१४ मध्ये जडेजाने तिच्या कामगिरीबाबत एक ट्विट केलं होतं त्यानंतर त्यावर सारा चर्चेत आली होती.
साराने जडेजाच्या ट्विटवर अनेक ट्विट केले. एक ट्विटमध्ये तिने म्हटलं की, आजची रात्र मी आणि तू? पुढच्या ट्विटमध्ये साराने म्हटलं की, अच्छा उद्या सकाळी १० वाजता पुलावर. यानंतर हे ट्विट चांगलेच चर्चेत आले.
जडेजाने साराच्या ट्विटवर त्यानंतर कोणताही रिप्लाय नाही दिला. पण या ट्विटमुळे सारा चांगलीच चर्चेत आली होती. पण हा एक प्रँक गेम होता असं तिने म्हटलं होतं.