मुंबई : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला. दिनेश कार्तिक हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या बॉलला ५ रन्सची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकनं ८ बॉल्समध्ये २९ रन्सची स्फोटक खेळी केली. कार्तिकच्या या इनिंगमध्ये ३ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिक या मॅचचा हिरो झाला तरी विजय शंकरवर मात्र या मॅचमध्ये केलेल्या खेळीमुळे जोरदार टीका झाली. मॅच जिंकल्यावर हॉटेलमध्ये टीमनं सेलिब्रेशन केलं पण विजय शंकरनं स्वत:ला रुममध्ये बंद केलं. काही वेळानं दिनेश कार्तिक विजय शंकरच्या रुममध्ये गेला. रुममध्ये येऊन कार्तिकनं मला समजवंल, अशी प्रतिक्रिया विजय शंकरनं दिली आहे.


विजय शंकरला पाठविण्याचा निर्णय चुकीचा...


विजय शंकरला त्याच्या आंतराराष्ट्रीय करिअरमध्ये पहिल्यांदा फलंदाजीला पाठविले तेही अशा स्थितीत जेव्हा खूप प्रेशर होते.  अशा स्थिती मोठ मोठ्या फलंदाजांना घामटा फुटतो.  पण नवख्या विजयला फलंदाजीला पाठविले.  इथेच रोहितचे चुकले. रोहित बाद झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक यायला हवा होता.  पण त्यांनी विजय शंकरला पाठविले.  विजयने हे लक्ष्य अजून कठीण बनवले. त्याने एक ओव्हरमधील चार चेंडू निर्धाव खेळले. त्यामुळे दुसऱ्या बाजूला प्रेशर आले आणि मनीष पांडे बाद झाला.


अनुभवची कमतरता....


भारतीय टीम अशा स्थितीला पोहचली ज्यावेळी १८ चेंडूत ३५ धावा पाहिजे होत्या. १८ षटकात कर्णधार शाकीब अल हसनने आपल्या संघाचा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज मुस्ताफीजूरकडे चेंडू दिला. त्याने चार चेंडू शंकरला खेळू दिले नाही आणि एकही धाव दिली नाही. पाचव्या चेंडूवर लेग बाय म्हणून एक धाव काढली. अंतीमच्या चेंडूवर मनीष पांडे स्ट्राइकवर आला आणि दबावामुळे त्याने आपली विकेट फेकली.


विजयचे १९ चेंडूत १७ रन्स...


विजयने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात श्रीलंकेत ट्राय सिरीजने केली. आपल्या करिअरममध्ये पहिल्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजीला आला. पण त्याने १९ चेंडूत केवळ १७ धावा केल्या.