पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी आणि अखेरची टी-२० मॅच आज पुण्यात खेळवली जाणार आहे. अखेरची ही टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. गुवाहाटीची पहिली टी-२० पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे रद्द झाली. यानंतर इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या मॅचआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने जोरदार सराव केला. हा सराव करतानाचा एक फोटो विराटने ट्विटरवर शेयर केला आहे. सराव करताना विराट कोहलीला छोले भटुरेंची आठवण झाली आहे. 'बॉलरच्या हातातून सुटलेला बॉल आणि चीट मिल म्हणून छोले भटुरेंकडे पाहताना तेवढंच लक्ष केंद्रीत करावं लागतं,' असं विराट त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.



असा आहे विराटचा डाएट प्लान


विराट कोहली हा त्याच्या फिटनेस आणि डाएटसाठी ओळखला जातो. विराटने त्याच्या फिटनेस आणि खाण्याच्या सवयींवर प्रचंड मेहनत घेतली आहे. फिट राहण्यासाठी विराट वेगनही बनला. विराटनं प्राण्यांपासून मिळणारं प्रोटीन खाणं बंद केलं. विराटनं मांसहार, अंड याबरोबरच गाय, म्हैस आणि बकरीचं दूध घेणंही बंद केलं. विराट दुधापासून बनलेलं पनीर, चीज, दही आणि आईसक्रीमही खात नाही.


विराट कोहली होल ग्रेन, डाळ, भुईमूग, बीज आणि फळांच्या माध्यमातून प्रोटीन घेतोय. याशिवाय विराट हिरवी पानं असलेल्या भाज्या, मोड आलेली कडधान्य, ठराविक तापमानात शिजवलेल्या भाज्या हा आहार विराट खातो. या डाएटमुळे पचन क्रिया मजबूत होते, असं मानलं जातं.