VIDEO : बाऊंड्रीवर विराट कोहलीचा प्रेक्षकांना इशारा
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
मालाहाईड : आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला. २० ओव्हरमध्ये भारतानं ५ विकेट गमावून २०८ रन केल्या. भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं १६० रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. भारताच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडनं २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १३२ रन बनवले. या मॅचदरम्यान फिल्डिंगदरम्यान विराट कोहली जसा बाऊंड्री लाईनवर पोहोचला तसे प्रेक्षक कोहली-कोहली नावानं घोषणा करू लागले. यानंतर विराटनंही हात हलवून प्रेक्षकांकडे इशारा केला. यानंतर संपूर्ण स्टेडियमच कोहली-कोहली नावाचा जयघोष करू लागलं. या मॅचमध्ये विराट शून्यवर आऊट झाला.
मधल्या फळीत प्रयोग होतील
ओपनिंग जोडीशिवाय मधल्या फळीमध्ये आम्ही प्रयोग करू. पुढच्या टी-२० मॅचमध्येही असेच प्रयोग होतील. आवश्यकतेनुसार बॅटिंगचा क्रम ठरवला जाईल, असं विराट कोहली या मॅचनंतर म्हणाला. मधल्या फळीतील बॅट्समनमध्ये बदल केल्यामुळे अशा बॅट्समनना संधी मिळते ज्यांना याआधी बॅटिंग मिळाली नाही. या मॅचमध्ये संधी न मिळालेल्या खेळाडूंना पुढच्या मॅचमध्ये संधी मिळेल, असं वक्तव्य कोहलीनं केलं.
पहिल्या टी-२०मध्ये रोहित शर्मानं ९७ रनची खेळी केली. तर कुलदीप यादवनं ४ ओव्हरमध्ये २१ रन देऊन ४ विकेट घेतल्या. कुलदीप यादवला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. आयर्लंडविरुद्धची दुसरी आणि शेवटची टी-२० मॅच शुक्रवारी होणार आहे.