भारत-बांग्लादेशच्या मॅचमध्ये आला `कोब्रा`, खेळाडू झाले हैराण
कोलंबाच्या प्रेमदासा स्टेडियमध्ये खेळल्या जाणाऱ्या निदाहास ट्रॉफितील पाचव्या मॅचमध्ये भारताची टीम बांगलादेशला भिडली. यामध्ये बांगला देशचा पराभव झाला.
नवी दिल्ली : कोलंबाच्या प्रेमदासा स्टेडियमध्ये खेळल्या जाणाऱ्या निदाहास ट्रॉफितील पाचव्या मॅचमध्ये भारताची टीम बांगलादेशला भिडली. यामध्ये बांगला देशचा पराभव झाला.
पण एक गोष्ट कायम खटकत राहिली ती म्हणजे मॅचमध्ये कोब्रा आल्याची.
विकेट किपरने मॅचदरम्यान 'कोब्रा'चावेल असा म्हटले पण कोब्रा नक्की कुठेय हे शोधताना भारताचे खेळाडू मात्र हैराण झाले.
बांगलादेशला मात पण..
भारताने पहिली बॅटींग करत बांगलादेशसमोर १७७ रन्सचे लक्ष्य ठेवले. आव्हान पार करण्यासाठी बांगलादेशची टीम मैदानात उतरली.
भारताचा युवा स्पिनर वॉशिंग्टन सुदरने तमीम इकबाब (२७), लिटन दास (७) आणि सौम्य सरकार (१) यांना आपलं शिकार बनवलं.
एकवेळ असं वाटल की बांगलादेशची टीम पूर्ण ओव्हर पण खेळणार नाही. पण असं झालं नाही. त्यांच्या भरवशाचा बॅट्समन मुश्फिकुर रहीम क्रिजवर आला आणि त्याने भारतीय बॉलर्सची धुलाई केली.
नाही समजल बांगलादेशी खेळाडूंना
रहिमला बॉलिंग करण वॉशिंग्टन सुंदरसाठी सोप्प नव्हतं. कारण बांगलादेशी बॅट्समनही फॉर्मात होते.
अशावेळी रहिमविरुद्ध रणनिती बनविण्याची गरज होती. दरवेळी विकेटमागे महेंद्रसिंग धोनी हे काम करताना दिसतो. पण त्याच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिकने ही जबाबदारी अंगावर घेतली.
रहीमला बॉलिंग करणं आवाहन
सुंदर जेव्हा रहीमला बॉलींग करायला आला तेव्हा कार्तिकने तामिळ भाषेत त्याला काहीतरी सांगितलं.
जे इतर कोणत्या खेळाडूंना समजले नाही. स्टंप माइकमध्ये कार्तिकच बोलण रेकॉर्ड होत होत. हे बोलणं जेव्हा हिंदीत सांगण्यात आल तेव्हा कोणाला हसू आवरल नाही.
मैदानावर केला होता नागिण डान्स
खरतर कार्तिकला म्हणायच होत की, ठीक बॉलिंग कर नाहीतर कोब्रा चावेल. कार्तिकचा इशारा रहीमकडे होता. ज्याने श्रीलंकेविरुद्धची मॅच जिंकल्यानंतर मैदानावर नागिण डान्स केला होता.