मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट सामन्यात खेळू शकला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने टीमचं नेतृत्व केलं. 1 जुलैपासून सुरू झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी रोहितचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला नाही. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा कोरोनामुक्त झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा आता पूर्णपणे बरा झाला असून त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. रिपोर्टनुसार, अशा परिस्थितीत हिटमॅनने आयसोलेशनमधून बाहेर आल्यानंतर टी-20 आणि वनडे सिरीजची तयारी सुरू केली आहे. 


टी-20 सिरीज 7 जुलैपासून साउथॅम्प्टनमध्ये सुरू होणार आहे. याशिवाय उर्वरित दोन सामने 9 आणि 10 जुलै रोजी बर्मिंगहॅम आणि नॉटिंगहॅममध्ये खेळवले जातील. एकदिवसीय मालिकेतील तीन सामने 12, 14 आणि 17 जुलै रोजी ओव्हल, लॉर्ड्स आणि मँचेस्टरमध्ये होणार आहेत.


टी-20 आणि एकदिवसीय सिरीजसाठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीमची घोषणा केली आहे. 7 जुलै रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या T-20 साठी टेस्ट सामने खेळणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. विराट कोहली, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह दुसऱ्या T20 सामन्यात टीममध्ये परतणार आहेत.