मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांनी ट्विटरवर फोटो टाकून ते जाहीर केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीमध्ये हा लग्न सोहळा सुरु आहे. टस्कनीमधील बोर्दो फिनोशोतो रिसॉर्टमध्ये हा विवाह झाला. हे रिसॉर्ट शहरापासून जवळपास 4-5 तासांच्या अंतरावर आहे.


ओबामांनी घालवली सुट्टी


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कुटुंबियांसह याच ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी थांबले होते. हा रिसॉर्ट ८०० वर्षे जुन्या गावाला रिनोवेट करुन बनवण्यात आला आहे. येथे आता विवाह सोहळे होतात.


महागडा रिसॉर्ट


६ एकरमध्ये बनलेल्या या रिसॉर्टमध्ये २२ खोल्या आहेत. ज्यामध्ये एकावेळी फक्त ४४ लोक थांबू शकतात. विराट आणि अनुष्काच्या विवाहाची अतिथी लिस्ट देखील खूपच लहान आहे. या रिजॉर्टमध्ये एक आठवडा थांबण्याचा खर्च जवळजवळ ८ कोटी रुपये आहे. फोर्ब्स लिस्टनुसार हा जगातील २० सर्वात महागड्या रिजॉर्टमध्ये एक आहे.