Suryakumar Yadav : टीम इंडिया अडचणीत असताना सूर्या मात्र हादडण्यात व्यस्त; कॅमेरा फोकस होताच दिलं असं रिएक्शन
Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एकीकडे टीम इंडिया अडचणीत सापडली होती, तर दुसरीकडे डग आऊटमध्ये बसलेला सूर्यकुमार यादव मात्र बिंधास्त पोटपुजा करताना कॅमेरात कैद झाला.
Suryakumar Yadav : वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांची बिकट परिस्थिती दिसून आली. रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एकीकडे टीम इंडिया अडचणीत सापडली होती, तर दुसरीकडे डग आऊटमध्ये बसलेला सूर्यकुमार यादव मात्र बिंधास्त पोटपुजा करताना कॅमेरात कैद झाला.
सूर्याने दिली मजेदार रिएक्शन
भारतीय डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव श्रेयस अय्यरच्या शेजारी बसला होता. टीम इंडियाचे 12 रन्सवर 3 विकेट अशी परिस्थिती होती. त्यानंतर कॅमेरामनने त्याच्यावर फोकस केलं. यावेळी सूर्याने चमच्याने खात होता. मात्र जेव्हा कॅमेरा आपल्यावर फोकस झाला आहे असं कळताच सूर्याने तोंड हलवणं बंद केलं. यावेळी सूर्याच्या चेहऱ्यावर चोरी पकडली गेल्याचे भाव दिसत होते. यानंतर सूर्याने कॅमेरा कोणत्या दिशेने आहे हे पाहिलं.
सूर्यकुमार यादवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान ज्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झालाय, त्या खाली सूर्याने कमेंट देखील केलीये. अरे भाई भाई, अशी सूर्याने यावेळी कमेंट केली आहे. यासोबतच त्याने हसण्याचे इमोजी देखील लगावले आहेत.
आगामी वर्ल्डकपच्या सामन्यात सूर्याला मिळणार संधी
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. यावेळी अय्यरला संधीचं सोनं करता आलं नाही. जर पुढच्या सामन्यात देखील अय्यरची बॅट चालली नाही तर सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे सूर्या वर्ल्डकप खेळणार का यावर चाहत्यांचं लक्ष आहे.
टीम इंडियाचा पुढचा सामना अफगाणिस्तानशी
वर्ल्डकपच्या स्पर्धेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. तर आता दुसरा सामना टीम इंडियाला अफगाणिस्तानशी खेळायचा आहे. 11 ऑक्टोबर रोजी हा सामना रंगणार आहे. हा सामना बुधवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यावेळी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंवर लक्ष्य राहणार आहे.