मुंबई : आज जगभरात क्रिकेट हा मोठ्या आवडीने पाहिला जाणार खेळ आहे. या खेळात फोर आणि सिक्स पाहण्यासाठी लोकांच्या खास अपेक्षा असतात. त्यामुळे फोर आणि सिक्स मारणाऱ्या खेळाडूंची लोकप्रियता ही अधिक असते. जगात अनेक असे क्रिकेटर्स आहेत ज्यांना लांब सिक्स मारण्यासाठी ओळखले जाते. गेल्या 5 वर्षात कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक फोर आणि सिक्स मारले आहेत. हे आपण पाहुयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 5 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार आणि चौकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आणि विराट कोहली अव्वल स्थानावर आहेत.


भारतीय संघाचा सलामीवीर आणि T20 कर्णधार रोहित शर्माने गेल्या 5 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 261 षटकारांसह सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक षटकार मारणारा तो पहिला फलंदाज आहे.


गेल्या 5 वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॉर्गनने 5 वर्षात 154 षटकार मारले आहेत.


मॉर्गन नंतर, गेल्या 5 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज एविन लुईस (149), आरोन फिंच (145) आणि त्यानंतर 5 व्या क्रमांकावर मार्टिन गुप्टिल (140) आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या 5 वर्षात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजाबद्दल बोललो तर या यादीत भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 936 चौकार मारले आहेत.


गेल्या 5 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत इंग्लंडचा जो रूट हा दुसरा फलंदाज आहे. ज्याने 798 चौकार मारले.


या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (788) तिसऱ्या क्रमांकावर, रोहित शर्मा (765) चौथ्या क्रमांकावर आणि जॉनी बेअरस्टो (698) पाचव्या क्रमांकावर आहे.