मुंबई : वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षापर्यंत दोन वेळा संन्यास जाहीर करणाऱ्या महिला खेळाडूची सध्या जगभरात चर्चा आहे. विशेष म्हणजे तिने यंदा ऑस्ट्रेलिया ओपनचं ग्रॅण्ड स्लॅम मिळवलं होतं. तिने वाढदिवसाच्या एक महिना आधी संन्यास घेण्याचा निर्णय सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून सांगितला. 


कोण आहे ही खेळाडू?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जगातील पहिल्या स्थानावर असलेल्या महिला टेनिस खेळाडू एश्ले बार्टीने संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिने हा निर्णय घेतला. तिने आपल्या करिअरमध्ये 3 ग्रॅण्ड स्लॅमवर आपलं नाव कोरलं आहे.  तिच्या या विजयाचं कौतुक जगभरात सुरू असताना तिने हा धक्कादायक निर्णय घेतला. 


एश्लेनं एकदा नाही तर दोनदा घेतला संन्यास 


याआधीही तिने युवा खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केली होती. 2014 मध्ये संन्यास घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर ती 2016 मध्ये कोर्टवर परतली आणि एकापाठोपाठ एक विजेतेपद पटकावून क्रमवारीत झपाट्याने वर आली.


टेनिसमध्ये जे तिने ठरवलं होतं ते ध्येय तिने पूर्ण केलं. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. आजचा दिवस खूप कठीण आणि भावुक करणारा आहे. यामागचं कारण म्हणजे मी निवृत्तीचा निर्णय जाहीर करत आहे. 


भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्वीट करून एश्लेला  लेजेंड, रोल मॉडेल असं म्हटलं आहे. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी खूश शुभेच्छाही सानियाने दिल्या आहेत. 


एश्लेनं आपल्या करिअरमध्ये 15 खिताब आपल्या नावावर केले आहेत. नुकतीच तिने ऑस्ट्रेलिया ओपन जिंकली. 2021 मध्ये विम्बल्डनचे विजेतेपदही पटकवलं आहे. 121 आठवडे ती पहिल्या क्रमांकावर होती. तिने आपल्या वाढदिवसाआधी निवृत्तीची घोषणा केली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Ash Barty (@ashbarty)