धोनीने सिक्स मारला अन् क्लिन बोल्ड झाली `मिस्ट्री गर्ल`, थालाची ती दिवाणी कोण?
Ayesha Khan: दिल्लीविरुद्ध खेळताना (DC vs CSK) धोनीने एकहाती सिक्स मारला अन् संपूर्ण स्टेडियम जल्लोषात नाचायला लागलं. त्यावेळी एक मिस्ट्री गर्ल सर्वांच्या नजरेत आली.
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings : तब्बल 308 दिवसांनी फलंदाजीला आलेल्या महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आक्रमक फलंदाजीचा जलवा दाखवला अन् धुंवाधार खेळी केली. धोनीने 16 बॉलमध्ये 37 धावांची खेळी करत 4 फोर अन् 3 गगनचुंबी षटकार खेचले. अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावांची गरज होती. धोनी मैदानात असल्याने चेन्नईचे चाहते उत्सुक होते. मात्र, धोनीला सामना जिंकवता आला नाही. मात्र, धोनीने चाहत्यांचं मन नक्कीच जिंकलं. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धोनीने पहिल्यांदाच फलंदाजीला आल्याने प्रेक्षकांचे पैसे देखील वसूल झाले. धोनी मैदानात येताच चाहत्यांनी एकट कल्ला केल्याचं दिसून आलं. प्रेक्षकांच्या सर्व गर्दीच एक चेहरा कॅमेऱ्याच्या नजरेआड होत नव्हता.
धोनी मैदानात आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 72 धावांची गरज होती. धोनीने पहिल्याच बॉलवर फोर मारला अन् चाहत्यांमध्ये उत्साह संचारला. तर दुसऱ्याच बॉलवर धोनीचा कॅच सुटला. खलीलने कॅच सोडल्याने आता धोनी सामना जिंकवणार, असं चाहत्यांना वाटत होतं. तिथून धोनी आणि जड्डूने हल्लाबोल सुरू केला. त्यावेळी धोनीने एकहाती सिक्स मारला अन् संपूर्ण स्टेडियम जल्लोषात नाचायला लागलं. त्यावेळी या जल्लोषात आयशा खान देखील (Ayesha Khan cheering for MS Dhoni) सहभागी झाली होती. धोनी-धोनीच्या घोषणा देताना आयशा खान दिसली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगत होता.
कोण आहे आयशा खान?
अभिनेत्री, मॉडेल अन् इन्फ्युएन्सर असा प्रवास आयशा खानचा राहिला आहे. बिग बॉस सीझन 17 मधून आयशाने आपली ओळख निर्माण केली. कसोटी जिंदगी की या मालिकेतून पदार्पण करणाऱ्या आशयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर बालवीर रिटर्न्समध्ये देखील आयशा खान दिसली होती. आयशा धोनीची मोठी चाहती आहे. अनेकदा ती स्टेडियमवर देखील दिसते. मुखचित्रम या नाटकाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
धोनी खेळला पण हरला
अखेरच्या 2 ओव्हरमध्ये चेन्नईला 46 धावांची गरज होती. मात्र, धोनी आणि जड्डू उपस्थित असताना त्यांना चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. मुकेश कुमारने 19 व्या ओव्हरमध्ये धोनीला अडचणीत आणलं अन् दिल्लीच्या पारड्यात सामना झुकवला.
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.