कोण आहे टीम इंडियातला `नौटंकीबाज`? रोहित, सूर्याने घेतलं `या` खेळाडूचं नाव
द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो मध्ये भारताला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या क्रिकेटर्स हजेरी लावली. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल इत्यादी खेळाडूंनी या शोमध्ये येऊन टीम इंडियातील अनेक धमाल किस्से सांगितले.
Who is Nautankibaaz in team india : द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो चा दुसरा सीजन सुरु झाला असून आतापर्यंत याचे दोन एपिसोड प्रसारित करण्यात आले आहेत. सीजनचा तिसरा एपिसोड 5 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला असून या एपिसोडमध्ये भारताला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या क्रिकेटर्स हजेरी लावली. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल इत्यादी खेळाडूंनी या शोमध्ये येऊन टीम इंडियातील अनेक धमाल किस्से सांगितले.
कपिल शर्मा आणि शोची जज अर्चना पूरन सिंह यांनी टीम इंडियाच्या विविध प्रश्न विचारले. यावेळी अर्चना पूरन सिंहने काही चित्रपटांची टायटल घेऊन हे टायटल टीम इंडियातील कोणत्या खेळाडूला सूट करत असं विचारलं. तेव्हा शोमध्ये आलेल्या खेळाडूंनी याची मजेदार उत्तर देत टीममधील अनेक सिक्रेट सांगितले. जज अर्चना पूरन सिंह यांनी खेळाडूंना विचारले 'नौटंकीसाला' या चित्रपटाचं टायटल कोणत्या खेळाडूला द्याल. तेव्हा रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यांनी 'नौटंकीबाज' म्हणून कुलदीप यादवचं नाव घेतलं.
हेही वाचा : VIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल... कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकित
सूर्यकुमारने सांगितलं की कुलदीप हा टीम इंडियातील नौटंकीबाज आहे. सूर्या म्हणाला, फिल्डिंग करताना अनेकदा कुलदीप यादव 'बहुत ज्यादा धूप लग रही है भैया, लाल होगये टमाटर जैसे', 'रोहित भाई यार धूप है बॅटिंग लेलो' असं म्हणतो. तो सगळ्यात जास्त नौटंकीबाज आहे. रोहित सह इतर खेळाडूही यावर सहमत झाले. तेव्हा कपिल शर्मा म्हणाला, 'अर्चना जी तुम्ही यामुळे टीम इंडियात भांडण लावलं' आणि सगळे हसू लागले'.
पाहा व्हिडीओ :
कोण आहे टीम इंडियाचा गजनी?
अर्चना सिंहने याच शो दरम्यान टीम इंडियात गजनी कोण आहे असा प्रश्न विचारला. यावर सूर्यकुमार यादवने रोहित शर्माकडे पाहिलं. रोहित शर्मा कपिलला म्हणाला हे टायटल माझ्यासाठीच आहे. यावर सर्वजण हसले. सध्या कपिल शर्मा शोमधील टीम इंडियाच्या एपिसोडचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.