मुंबई : आयपीएलच्या पुढील हंगामाबद्दल चाहते आधीच उत्सुक आहेत, जे अजून 6-7 महिने दूर आहे. आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये 2 नवीन संघ दिसतील. यावेळी मेगा लिलाव देखील होईल. मोठ्या लिलावापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्या भावी कर्णधाराचा विचार करावा लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या विद्यमान कर्णधार विराट कोहलीने या मोसमानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. विराट कोहलीनंतर आरसीबीचा कर्णधार कोण असेल याबाबतही काही नावं चर्चेत आहेत. मात्र कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार हे पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. 


कर्णधारपदासाठी साहजिकच एबी डिव्हिलियर्सचं नाव पहिलं घेतलं जातंय. पण तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याकडेही वाटचाल करतोय. अशा परिस्थितीत त्याला कर्णधार बनवणं हा अल्पकालीन निर्णय असेल. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि माजी आरसीबी गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहराने कर्णधारासंदर्भात त्याचं मत व्यक्त केलं आहे.


नेहरा म्हणाला की, जर फ्रेंचायझीला लाँग टर्मसाठी उपाय हवा असेल तर देवदत्त पडिक्कल हा एक चांगला पर्याय असू शकतो. पडिक्कलमध्ये आरसीबीचं प्रभावीपणे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. जर फ्रेंचायझी बराच काळ कर्णधार म्हणून खेळाडू शोधत असेल तर त्यांना टीमची कमान पडीक्कलच्या हातात सोपवावी लागेल.


पडिक्कल फक्त 21 वर्षांचा आहे आणि खेळाडू म्हणून लीगमधील त्याचा हा दुसरा सीझन आहे. जर तो आरसीबीचा कर्णधार झाला तर तो फ्रँचायझीसाठी एक चांगला उपाय ठरू शकतो. आरसीबीसाठी त्याची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे.