Mystery Girl With Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या वर्ल्डकपमध्ये त्याचा खेळंही उत्तम आहे. मात्र अनेकदा शुभमन त्याच्या पर्सनल लाईफमुळेही बराच चर्चेत असतो. सध्याही शुभमनच्या अफेअरची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे आणि याचं कारण म्हणजे तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा पुढचा सेमीफायनलचा सामना असून तो मुंबईत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मुंबईत पोहोचली असून शुभमन गिल पुन्हा चर्चेत आला आहे. एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर शुभमनसोबत एक मिस्ट्री गर्ल दिसली तेव्हा हा प्रकार घडला. मुळात व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लोकांना शुभमनसोबत एक मुलगी दिसतेय. मात्र या मुलीचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही. त्यामुळे ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, ही चर्चा रंगली आहे. 


एअरपोर्टवर स्पॉट झाला शुभमन


वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. यासाठी टीम इंडिया मुंबईत पोहोचली आहे. टीम इंडियाचे जवळपास सर्वच खेळाडूंना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी शुभमन गिलही टीमसोबत दिसला. मात्र यावेळी सेंटर ऑफ एट्रॅक्शन ठरली शुभमनसोबत दिसलेली मुलगी. या मुलीला शुभमनसोबत पाहताच लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट करायला सुरुवात केली. 


कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?


काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही तिच मुलही आहे, जिच्याशी शुभमन गिलचं अफेअर सुरु असल्याची अफवा आहे. मात्र अद्याप सध्या तरी ही मुलगी कोण आहे याची पुष्टी झालेली नाही. सध्या शुभमन गिलच्या अफेअरची चर्चा अनेक ठिकाणी असून सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत अफेअर असल्याचं म्हटलं जातं.


टीम इंडियाची वर्ल्डकपमध्ये तुफान कामगिरी


सध्याच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त आहे. आतापर्यंत टीम इंडियाने 9 सामने झाले असून टीम इंडियाने अजिंक्य राहत सलग 9 सामने जिंकले आहेत. त्यामुळेच भारतीय चाहत्यांच्या टीम इंडियाकडून वर्ल्डकप जिंकण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 15 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाला न्यूझीलंडशी सामना करायचा आहे. हा सामना जिंकल्यावर टीम इंडियाला फायनलचं तिकीट मिळू शकतं.