Who is Dhruv Jurel: टीम इंडियाला 25 जानेवारीपासून इंग्लंड विरूद्ध 5 सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. या सिरीजसाठी बीसीसीआयने शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा केली. या सिरीजमध्ये टीम इंडियाच्या ताफ्यात 22 वर्षीय तरूण खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. ध्रुव जुरेल विकेटकीपर फलंदाज आहे. तर या सिरीजसाठी कर्णधार म्हणून रोहित शर्माची नियुक्ती झाली असून उपकर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. 


कोण आहे ध्रुव जुरेल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवा खेळाडू ध्रुव जुरेलचा जन्म 21 जानेवारी 2001 मध्ये आगऱ्यात झाला होता. त्याने शाळेत समर कॅम्प दरम्यान क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. मुलांना क्रिकेट खेळताना पाहून त्याची या खेळात आवड निर्माण झाली. तो उत्तर प्रदेशच्या अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 टीमसाठी क्रिकेट खेळला. जुरेलने 10 जानेवारी 2021 रोजी 2020-21 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशसाठी टी-20 डेब्यू केलं होतं. 


अंडर 19 वर्ल्डकपचा भाग होता जुरेल


जुरेल हा भारताच्या 2020 अंडर-19 वर्ल्डकपच्या टीमचा एक भाग होता. या स्पर्धेत ध्रुवच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. अंतिम फेरीत भारताला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. या विकेटकीपर फलंदाजाने स्पर्धेत 6 सामने खेळले आहेत. तीन डावात फलंदाजी करताना त्याने 44.50 च्या सरासरीने 89 रन केले आणि अर्धशतकही ठोकलं. जुरेलने 2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या रणजी टीमसाठी प्रथम श्रेणीमध्ये डेब्यू केलं होतं.


2023 च्या आयपीएलमध्ये केलं डेब्यू


22 वर्षीय ध्रुव जुरेलने 2023 इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी डेब्यू केला होता. राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये जुरेलला टीममध्ये सहभागी केलं होतं. यावेळी त्याला संघात फिनिशरची भूमिका देण्यात आली होती. अनेक सामन्यांमध्ये तो प्रभावशाली खेळाडू म्हणूनही खेळला. जुरेलने त्याच्या पदार्पणाच्या आयपीएल हंगामात 172.73 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने 152 रन्स केले होते. यावेळी नाबाद 38 रन्स ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. 


कशी आहे इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी टीम इंडिया ( 2 टेस्ट सामने )


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार) आणि आवेश खान.