ICC ODI WC: वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियातला युवराज सिंग कोण? माजी कर्णधाराने सांगितलं नाव
2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या विजयाचा खरा हिरो होता तो स्टार फलंदाज युवराज सिंग
ICC World Cup 2023 : महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात 2011 मध्ये भारताने (Team India) अंतिम सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) पराभव केला आणि विश्वचषकावर (World Cup 2011) नाव कोरलं. 1983 नंतर म्हणजे तब्बल 28 वर्षांनी भारताने ही किमया साधली. आता पुन्हा एकदा भारतात विश्वचषक स्पर्धा होतेय. पुन्हा एकदा भारतीय संघ विश्वचषकावर नाव कोरणार का? याकडे करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींचं लागलं आहे. 2011 मध्ये अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीने युवराजने कमाल केली होती. आता प्रश्न आहे की यंदा भारतीय संघातील युवराज सिंग कोण असणार?
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. यावेळच्या विश्वचषकात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ही जबाबादारी पार पाडू शकेल अशी शक्यात श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे. युवराज सिंहने 2011 विश्वचषक स्पर्धेत 362 धावा केल्या होत्या. तर 15 विकेट घेतल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट घोषित करण्यात आलं होतं. आताच्या टीम इंडियात रवींद्र जडेजाकडून या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जातेय. जडेजा डाव्या हाताचा उत्तर स्पीनर आहे. याशिवाय खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सामना फिरवण्याची ताकद त्याच्यात आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि 2011 मध्ये निवड समितीचे अध्यक्ष असलेले श्रीकांत यांनी भारतीय मैदानांवर फिरकीला जास्त फायदा मिळेल असं म्हटलं आहे. भारतीय खेळपट्ट्या या इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या नाहीत. भारतीय खेळपट्ट्या फिरकीला मदत करणाऱ्या असून रवींद्र जडेजासारख्या गोलंदाजाला याचा जास्त फायदा मिळू शकतो, असं श्रीकांत यांनी म्हटलंय. रवींद्र जडेजा व्यतिरिक्त अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही टीम इंडियात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असंही श्रीकांत यांनी म्हटंलय.
10 वर्षांपासून प्रतीक्षा
गेल्या दहा वर्षात टीम इंडियाने एकही आयसीसी ट्ऱॉफी जिंकलेली नाही. 2011 मध्ये भारताने विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2013 मध्ये धोनीच्याच नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी नावावर केली. पण यानंतर गेल्या दहा वर्षात टीम इंडिया एकही ट्ऱॉफी जिंकलेली नाही. 2021 आणि 2021 मध्ये भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला पण उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. 2014 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. पण इथेही श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला.