मुंबई : आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 (ICC T20 World cup) ही विराट कोहलीची (Virat Kohli) कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा असेल. या मेगा इव्हेंटनंतर विराट कोहली टी-20 फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. विराट कोहलीने आधीच आपला राजीनामा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे अर्थात बीसीसीआयकडे सादर केला आहे. टी 20 विश्वचषकानंतर विराट टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडेल. स्पर्धेनंतर, पण टीम इंडियाचा पुढील कर्णधार कोण असेल याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Who will be the captain of Team India after the T20 World Cup?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे की, टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा (Rohit sharma) टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल. इनसाइडस्पोर्टशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "रोहित शर्मा विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटचा कर्णधार असेल, पण त्याची घोषणा मेगा इव्हेंटनंतर होईल." रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे आणि अशा परिस्थितीत त्याची जागा कोण घेणार, याची पुष्टी झालेली नाही, पण टी -20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधारपद केएलकडे जाऊ शकते.


जेव्हा रोहित शर्मा दुखापतीमुळे आयपीएल 2020 नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नाही, तेव्हा केएल राहुलला (KL rahul) त्याच्या जागी मर्यादित षटकांसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले. अशा परिस्थितीत केएल राहुलला उपकर्णधारपद देण्यात येण्याची सर्व शक्यता आहे. दुसरीकडे ऋषभ पंतचं (Rishabh pant) नाव देखील उपकर्णधारपदाच्या चर्चेत आहे.