मुंबई : भारतीय टेस्ट संघाचा (Team India) उपकर्णधार (Vice captain) रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन टेस्ट सामन्यांच्या सीरीजमधून (Ind vs SA) बाहेर झाला आहे. कारण मुंबईत सरावा दरम्यान त्याला दुखापत झालीये. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 26 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. (India vs South africa Test series)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि दक्षिण आफ्रिया यांच्या 3 सामन्यांची सीरीज रंगणार आहे. यासाठी टीम इंडिया 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहे.


रोहितच्या जागी कोण होणार उपकर्णधार?


भारत ‘ए’ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळ टेस्ट सीरीजसाठी ओपनर म्हणून रोहित शर्मासोबत पर्याय होता. पण आता रोहित शर्मा टेस्ट सिरीजमधून बाहेर झाल्याने उपकर्णधार कोण होणार याबाबत प्रश्न उभा राहिला आहे. ज्यामध्ये या खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.


1. लोकेश राहुल (KL Rahul)


लोकेश राहुल टेस्ट सीरीजसाठी उपकर्णधार म्हणून स्पर्धेत सर्वात वर आहे. लोकेश राहुल टीम इंडियासाठी ओपनिंग करु शकतो. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल ओपनिंगसाठी उतरु शकतात. राहुलकडे उपकर्णधार पदाची देखील जबाबदारी दिली जावू शकते.


2. ऋषभ पंत (Rishabh pant)


लोकेश राहुल नंतर दुसरा पर्याय म्हणजे ऋषभ पंतचा असेल. ऋषभ पंत विकेटकीपिंग दरम्यान गोलंदाजांना योग्य सल्ला देत असतो. आयपीएलमध्ये ही ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली संघाने चांगसी कामगिरी केलीये. 


3. रविचंद्रन अश्विन (R Ashwin)


उपकर्णधार पदासाठी तिसरा दावेदार म्हणजे रविचंद्रन अश्विन. अजिंक्य रहाणेला सध्या त्याच्या पदावरुन हटवण्यात आलंय. प्लेइंग इलेवनमध्ये त्याला संधी मिळणार का याबाबत ही शंका आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टेस्ट टीममध्ये एकमात्र स्पिनर अश्विन उपकर्णधार म्हणून स्पर्धेत कायम आहे. बीसीसीआयच्या एका वर्गाचं असं म्हणणं आहे की, त्यांची कामगिरी पाहता त्याला सन्मान म्हणून हे पद दिलं पाहिजे.