KKR vs SRH Head to head : कोण मिळवणार फायनलचं तिकीट? सनरायझर्स घेणार केकेआरचा बदला?
KKR vs SRH head to head : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या क्वालिफायर 1 मध्ये टेबल-टॉपर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना (Qualifier-1) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
IPL 2024 KKR vs SRH Head To Head : आयपीएल 2024 चे साखळी सामने संपल्यानंतर आता प्लेऑफच्या लढली सुरू झाल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेजर्सं बंगळुरू या चार संघांनी प्लेऑफचं तिकीट निश्चित केलंय. क्वालिफायर-1 मध्ये केकेआर आणि हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात सामना खेळवला जाईल. तर इलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी (RR vs RCB) यांच्यात खेळवला जाणार आहे. अशातच आता क्वालिफायर -1 मध्ये (Qualifier-1) कोण जिंकणार आणि फायनलचं तिकीट गाठणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
हेड-टू-हेड (KKR vs SRH Head To Head)
इंडियन प्रीमियर लीगमधील केकेआर विरुद्ध हैदराबाद हेड-टू-हेड रेकॉर्डनुसार, दोन्ही बाजूंनी 26 सामने खेळले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने 17 सामने जिंकले आहेत तर सनरायझर्स हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत. त्यामुळे एकूण विक्रमांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे सनरायझर्स हैदराबादवर पूर्ण वर्चस्व आहे. यंदाच्या हंगामात केकेआरने हैदराबादला घरच्या मैदानावर हरवलं होतं. त्यामुळे आता हैदराबाद बदला घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्लेऑफमध्ये कोण वरचढ?
आयपीएल प्लेऑफ स्पर्धांमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबादने दोन वेळा तर कोलकाता नाईट रायडर्सला फक्त एकदाच विजय मिळवता आला. त्यामुळे आता केकेआर स्कोर बरोबरीत करणार का? यावर सर्वांचं लक्ष लागलंय.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ - रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मनीष पांडे, नितीश राणा, श्रीकर भारत , शेरफान रदरफोर्ड, दुष्मंथा चमीरा, अंगक्रिश रघुवंशी, साकिब हुसैन, सुयश शर्मा, अल्लाह गझनफर, चेतन साकरीया.
सनरायझर्स हैदराबादचा संघ - हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, अब्दुल समद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर , जयदेव उनाडकट, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, झटावेध सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग.