Avesh Khan : सोमवारी आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरूद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स  (Lucknow Super Giants) यांच्यात सामना रंगला होता. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर आवेश खानने एक रन काढत लखनऊ सुपर जाएंट्सला विजय मिळवून दिला. दरम्यान या थरारक विजयानंतर आवेश खानने (Avesh Khan) त्याचं हेल्मेट काढून जोरात खाली आदळलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवेश खानच्या या कृत्यावरून बीसीसीआयने त्यावर एक्शन देखील घेतली. तर सामना संपल्यानंतर आवेशने याबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आवेशने आदळलेल्या हेल्मेटचे पैसे कोण देणार, याचं उत्तर दिलं आहे. 


या व्हिडीओमध्ये आवेश खानला प्रश्न विचारण्यात आला की, तु जे हेल्मेट तोडलंस त्याचे पैसे कोण देणार? याबाबत बोलताना आवेश म्हणाला, त्याचे पैसे मॅनेजमेंट देणार आहे. मला कुठे पैसे द्यायचे आहेत. मुळात त्या क्षणी मी कोणताही विचार केला नाही. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. 


श्वास रोखून धरणारा सामना


रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यातील सामना श्वास रोखून धरणारा होता. या सामन्यामध्ये लखनऊला शेवटच्या बॉलवर एका रनची गरज होती. गोलंदाजाने बॉल टाकल्यावर स्ट्राईकवर असलेल्या आवेशला कोणताही शॉट खेळता आला नाही. मात्र दिनेश कार्तिकच्या चुकीच्या थ्रोमुळे लखनऊचा विजय झाला. 


आवेशने आदळलं हेल्मेट


विजयी रन काढल्यानंतर लखनऊचा खेळाडू आवेश फार खूश झाला होता. यावेळी त्याने आनंदाच्या भरात हेल्मेट काढून जमिनीवर आदळलं. त्याच्या या कृत्यामुळे BCCI ने त्याला वॉर्निंग दिलीये. मात्र यानंतर याबाबत बीसीसीआयने आवेश खानला फटकारलंय. आयपीएलच्या निवेदनात म्हटलंय की 'आवेश खानने हॅल्मेट फेकणं हे नियमांचं उल्लंघन आहे. हे प्रकरण लेव्हल 1 आयपीएल आचारसंहितेच्या अधिनियम 2.2 अंतर्गत आहे. 



आवेश खानला मिळाली वॉर्निंग


बीसीसीआयने फटकारल्यानंतर आवेशने त्याची चूक मान्य केलीये. ही त्याची पहिलीच चूक असल्याने बीसीसीआयने त्याला केवळ वॉर्निंग दिलीये. शिवाय या सामन्यामध्ये फाफ डू प्लेसिसला (Faf du Plessis) स्लो ओव्हर रेट ठेवल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.