मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांतील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करेल. दरम्यान आता टीम इंडियाचे दोन दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा स्थितीत रहाणे आणि पुजारा संघात असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कोणाला दुसऱ्या टेस्टमधून बाहेर करणार असा प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे. तर यावर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी माहिती दिली आहे.


भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी बुधवारी सांगितलं की, शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघ वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला पाठिंबा देतात. हे फलंदाज लवकरच फॉर्ममध्ये परततील. 


पारस पुढे म्हणाले, “मला वाटतं की, आम्ही अजिंक्य आणि पुजारा दोघांनाही ओळखतो की, त्यांच्याकडे खूप अनुभव आहे. ते पुरेसं क्रिकेट खेळलेत आणि एक संघ म्हणून आम्हाला हे देखील माहित आहे की तो फॉर्ममध्ये परत येण्यापासून एक डाव दूर आहे. त्यामुळे एक संघ म्हणून आम्ही सर्वजण त्याला पाठिंबा देत आहोत."


भारताचे दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे खराब फॉर्मशी झुंजत आहेत. 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये रहाणेने 21 डावांमध्ये 19.57 च्या सरासरीने फक्त 411 धावा केल्या आहेत, ज्यात फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे. रहाणेने कानपूर कसोटीत 35 आणि 4 धावा केल्या, त्यानंतर त्याची फलंदाजीची सरासरी 40 च्या खाली गेली. 


दुसरीकडे, पुजाराला दोन वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेलं नाही. पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या दोघांवर धावा काढण्याची जबाबदारी होती, मात्र हे दोन्ही फलंदाज त्यात अपयशी ठरलेत.