Team India: विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माच्या हाती संघाची धुरा देण्यात आली. मात्र आता रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या वनडे आणि टेस्ट संघाचा कर्णधार कोण असेल? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. भारताचा अनुभवी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने संघाच्या कर्णधारपदी कोण असेल? याबाबत सांगितलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टेस्ट संघाचा कर्णधार होईल. बुमराहने एजबेस्टनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट सामन्यात संघाचं नेतृत्व केलं होतं. पण इंग्लंडने सात गडी राखून पराभव केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉबिन उथप्पा याने सांगितलं की, "माझ्या मते, बुमराह टेस्ट कसोटीचा कर्णधार असेल. वनडेसाठी केएल राहुल आणि ऋषभ पंत असे पर्याय असतील." रॉबिन उथप्पा याने विराट कोहली बद्दलही आपलं मत मांडलं. "आपल्याकडे त्याच्या खेळण्याच्या तसेच जिंकण्याच्या क्षमतेवर बोट दाखवण्याचा कोणताही अधिकार नाही. कोहली मॅच विनर खेळाडू आहे आणि जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे."


मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी उथप्पा अनेक क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान आहे. त्याने आपल्या मानसिक संतुलन व्यवस्थित करण्याच्या प्रवासाविषयीही सांगितले. 'मी लोकांशी बोलत नव्हतो कारण मी मानसिकरित्या अनेक समस्या हाताळत होतो आणि त्यामुळे लोक मला अहंकारी समजत होते.'