RR vs GT, IPL 2023: इंडियन प्रीमिअर लीगमधील 48 व्या सामन्यात  (IPL 2023) गुजरात टायटन्सने नऊ गडी राखून राजस्थान रॉयल्सचा दारूण पराभव (RR vs GT) केला. घरच्या मैदानावर पराभव झाल्याने हा पराभव राजस्थानच्या जिव्हारी लागल्याचं पहायला मिळतंय. प्रथम फलंजाजी करताना राजस्थानचा संघ 17.5 ओव्हरमध्ये 118 धावा करत बाद झाला. त्याला प्रत्युत्तर देताना गुजरातने 13.5 ओव्हरमध्ये खेळ संपवला. मात्र, या सामन्यात एक विचित्र घटना पहायला मिळाली. (Confusion Between Sanju Samson And Yashasvi Jaiswal Poor Run Out In RR vs GT IPL 2023 Watch Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत आहे. गुजरातविरुद्ध जयस्वाल गोलंदाजांसाठी काळ ठरत होता. मोहम्मद शमीच्या एकाच ओव्हरमध्ये त्याने एक सिक्स आणि फोर मारून लक्ष स्पष्ट केलं होतं. तर बटलर बाद झाल्यावर त्याला साथ देत होता कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson). मात्र, पावर प्लेच्या शेवटच्या ओव्हरला नको ते घडलं आणि त्याचा तोडा चेन्नईच्या संघाला झाला.


आणखी वाचा - RR vs GT: अफगाणी जोडीसमोर राजस्थानचा खुर्दा; पराभवानंतर संजूचा चेहराच उतरला, म्हणतो...


अखेरच्या ओव्हरमध्ये राशीद खान (Rashid Khan) गोलंदाजी करत होता. 6 व्या ओव्हरच्या एका पहिल्याच बॉलवर संजूने पाईंटच्या दिशेने सुंदर फटका मारला. मात्र, त्याठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या अभिनवने बॉल आडवला आणि दुसऱ्या फिल्डरने बॉल नॉन स्टाईकच्या दिशेने थ्रो केला. तोपर्यंत यशस्वी जस्वालने धाव घेतली. मात्र, संजू जागेवरून हाललाच नाही. येस नो येस नोच्या वादात यशस्वी बाद झाला. राशीदच्या फिरकीत संजू सॅमसनही जाळ्यात अडकला. राशीदने बॉल कलेक्ट करत बेल्स उडवल्या.


पाहा Video



दरम्यान, जयस्वाल ज्यावेळी बाद झाला त्यावेळी तो 14 धावांवर खेळत होता. तर संजू सॅमसन 13 बॉलमध्ये 23 धावांवर खेळत होता. संजू सॅमसनने आपली चूक कबुल करत हातवारे करत यशस्वीची माफी देखील मागितली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेमकी चूक कोणाची? संजूची की यशस्वी जयस्वालची ? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. व्हिडिओ पाहून तुम्हीच सांगा. नेमकी चूक कोणाची?