IPL Schedule 2024: गुरुवारी आयपीएलच्या ( IPL 2024 ) शेड्यूलची घोषणा करण्यात आली. चाहते गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या वेळापत्रकाची वाट पाहत होते. परंतु आयपीएलने यंदाच्या वेळी संपूर्ण शेड्यूलची घोषणा केलेली नाही. गुरुवारी केवळ पहिल्या 21 सामन्यांच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. 


केवळ 17 दिवसांच्या शेड्यूलची घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी आयपीएलच्या ( IPL 2024 ) पहिल्या टप्प्याच्या शेड्यूलची घोषणा करण्यात आली आहे. सध्या 17 दिवसांत होणाऱ्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलं गेलं आहे. पण असं अर्धवट शेड्यूल का जाहीर करण्यात आलंय याची तुम्हाला कल्पना आहे का?


संपूर्ण शेड्यूलची घोषणा का नाही केली?


आयपीएल 2024 ( IPL 2024 ) म्हणजेच 17 व्या सिझनचं केवळ पहिल्या 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या पहिल्या सिझनमध्ये एकूण 21 सामने खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक चाहत्यांच्या मनात प्रश्न पडला आहे की, बीसीसीआयने संपूर्ण वेळापत्रक एकत्र का जाहीर केलं नाही?


यंदाच्या वर्षी देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे या स्पर्धेचे वेळापत्रक 2 टप्प्यात जाहीर करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक निवडणुकीच्या तारखांनंतर जाहीर केलं जाणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे सध्या बीसीसीआयने 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणाऱ्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. आता इंडियन प्रीमियर लीग 2024 ( IPL 2024 ) च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक कधी घोषित होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


पहिल्या टप्प्यात 'या' ठिकाणी रंगणार आयपीएलचे सामने


आयपीएलच्या यंदाच्या सिझनमधील पहिल्या टप्प्यातील सामने चेन्नई, मोहाली, कोलकाता, जयपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, लखनऊ, विशाखापट्टणम, हैदराबाद आणि मुंबई या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामघ्ये चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहेत. तर दुपारचे डबल हेडरचे सामने दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळवले जाणार आहेत.