Hardik Pandya In Mumbai indians : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड झाल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत होती. मात्र, आयपीएलने अधिकृत घोषणा करत चर्चेवर शिक्कामोर्तब केलं आहे. मागील आयपीएल हंगामानंतर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai indians) परतण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती. अशातच आता हार्दिकची इच्छा पूर्ण झाली आहे. मुंबई इंडियन्समध्ये शिरकाव करताच हार्दिकला भावना अनावर झाल्या. त्याने गुजरात टायटन्सचे आभार मानले (Hardik Pandya First reaction) आहेत.


काय म्हणाला Hardik Pandya ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला गुजरात टायटन्सच्या चाहत्यांचे, संघाचे आणि व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानायचे आहेत. संघाचा भाग बनणे आणि त्याचे नेतृत्व करणे हा एक पूर्ण सन्मान आहे आणि मी माझ्या कुटुंबाच्या प्रेम आणि प्रोत्साहनाबद्दल अत्यंत आभारी आहे आणि मला एक खेळाडू म्हणून मिळाले आहे. गुजरात टायटन्स सोबतच्या आठवणी आणि अनुभव माझ्या हृदयात कायमचे एक विशेष स्थान धारण करतील. अविस्मरणीय प्रवासाबद्दल धन्यवाद, अशी पोस्ट हार्दिक पांड्याने केली आहे.



पांड्यालाच GT सोडायची होती?


हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. गुजरात टायटन्सचा पहिला कर्णधार म्हणून, हार्दिक पंड्याने फ्रँचायझीसाठी दोन हंगामात शानदार कामगिरी केली. त्याच्यान नेतृत्वखाली टाटा आयपीएल चॅम्पियनशिप जिंकली होती, त्यामुळे आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो, असं गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी यांनी म्हटलं आहे.


गुजरात टायटन्स


कायम ठेवलेले खेळाडू : अभिनव सदारंगनी, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा.


सोडलेले खेळाडू : अल्झारी जोसेफ, दासुन शनाका, केएस भरत, ओडियन स्मिथ, प्रदीप सांगवान, शिवम मावी, उर्विल पटेल, यश दयाल.