दुबई : T-20 वर्ल्डकप 2021चा अंतिम सामना आज संध्याकाळी 7:30 पासून न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 'शत्रुत्व' काहीसं भारत आणि पाकिस्तान यांच्यासारखंच आहे. 2015च्या एकदिवसीय वर्ल्डकपनंतर, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ पुन्हा एकदा कोणत्याही ICC स्पर्धेत अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे आहेत.


का खास आहे हा टी-20 वर्ल्डकप?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

T20 वर्ल्डकप 2021ची फायनल खूप खास असेल. ही फायनल दोन शेजारी देशांमध्‍ये आहे, जे 6 वर्षांपूर्वी 2015 च्‍या वनडे वर्ल्ड कपच्‍या फायनलमध्‍येही आमने-सामने आले होते. या फायनलमुळे टी-20 फॉरमॅटला नवा वर्ल्डचॅम्पियन मिळणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेतील दोन बलाढ्य संघांना पराभूत करून सर्व अंदाज खोटे ठरवले आणि अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 5 विकेट्स राखून पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव केला.


न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये वैर का?


हे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियापासून सुमारे 1500 किमी अंतरावर आहे आणि दोन्ही देशांच्या दरम्यान तस्मानिया समुद्र आहे. न्यू कॅलेडोनिया, फिजी आणि टोंगासारख्या इतर बेटांपासून ते सुमारे एक हजार किलोमीटर दूर आहे. न्यूझीलंड देश इतका दूर आहे की मानवी वस्तीही खूप दिवसांनी त्याठिकाणी पोहोचली. 


न्यूझीलंडच्या अधिकृत वेबसाइटनुसार, इथल्या इतिहासात माओरी आणि युरोपियन संस्कृतीचे मिश्रण आढळते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश तस्मान समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहेत. तस्मान समुद्र दोन देशांच्या मध्ये आहे. बरेच लोक न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाचा भाग मानतात, जो न्यूझीलंडच्या कोणत्याही नागरिकाला आवडत नाही. खेळाच्या मैदानावरही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे.


क्रिकेटशिवाय रग्बीमध्येही दोघांची चुरशीची स्पर्धा


1930 पासून राष्ट्रकुल स्पर्धेत दोन्ही देश एकमेकांविरुद्ध लढत आहेत. क्रिकेटशिवाय रग्बी, नेट बॉल, हॉकीसह इतर खेळांमध्येही दोन्ही देशांमधील वैर खूप सर्वांना माहितीये. 


न्यूझीलंडची पहिली T20 फायनल


न्यूझीलंडची ही पहिलीच T-20 वर्ल्डकप फायनल आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनवर नेहमीच वर्चस्व राखलं आहे. न्यूझीलंडने 2016च्या विश्वचषकातील त्यांचा एकमेव सामना भारतात जिंकला होता.