Black Armbands In WTC Final: इंग्लंडच्या 'द ओव्हल' मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात जागतिक क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेचा फायनल सामना खेळवला जात आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने धमाकेदार सुरूवात केलीये. भारत आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) फायनलसाठी दोन्ही संघाचे प्लेयर्स डाव्या खांद्यावर काळ्या हातपट्ट्या घालून मैदानात उतरले होते. त्याचं कारण आता समोर आलंय.


काय आहे कारण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिसा ट्रेन अपघातातील (Odisha train accident) बळींच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधत आहेत. तीन दिवसांपूर्वी ओडिसा येथे झालेल्या अपघातात तब्बल 280 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर हजारहून अधिक लोकं जखमी झाले होते. भारतीय रेल्वे अपघाताच्या इतिहासात हा तिसरा सर्वात मोठा अपघात होता. त्यामुळे देशभर संतापाचं वातावरण होतं. खुद्द पंतप्रधानांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. त्यानंतर अनेकांनी मदतीचे हात पुढे केले होते. अशातच आता टीम इंडियाने स्मृतीप्रित्यर्थ हातावर काळी पट्टी बांधली आहे.


2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या WTC फायनलमध्येही भारतीय खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते. त्यावेळी भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच निधन झालं होतं, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या WTC फायनलमध्ये काळ्या पट्टीसह खेळाडू मैदानात उतरले आहेत.


आणखी वाचा - टॉस जिंकत रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; 'या' खेळाडूला दिली संधी!


दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 26 धावा करत 1 विकेट गमावली आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) उस्मान ख्वाजाची (Usman Khawaja) विकेट काढत पहिला धक्का ऑस्ट्रेलियाला दिला आहे.



दोन्ही संघाची Playing XI


टीम इंडिया (Playing XI): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (WC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


ऑस्ट्रेलिया (Playing XI): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (WC), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.