IND vs WI: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण
Black Armbands in IND vs WI 1st ODI: त्रिनिदाद, टोबॅगो आणि डब्ल्यूआयचे माजी क्रिकेटपटू रॅफिक जुमादीन यांच्या निधनामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आज काळ्या आर्मबँड पट्टा घातल्या आहेत.
IND vs WI Black Armbands: वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या वनडे सामना (India vs West Indies 1st ODI ) ब्रिजटाऊन बारबाडोस इथं खेळवण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात कॅरेबियन खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. त्यामुळे काळ्या पट्टा बांधून खेळण्याचं कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने (West Indies) उत्तर दिलं आहे.
काळ्या पट्टा बांधून खेळण्याचं कारण काय?
त्रिनिदाद, टोबॅगो आणि डब्ल्यूआयचे माजी क्रिकेटपटू रॅफिक जुमादीन (Raphick Jumadeen) यांच्या निधनामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आज काळ्या आर्मबँड पट्टा घातल्या आहेत.
पाहा Playing XI
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh kumar) भारताकडून वनडे डेब्यू करणार आहे. सामन्यापूर्वी त्याला भारताची वनडे कॅप देण्यात आली होती. तर जयदेव उनाटकटने (Jaydev Unadkat) शेवटचा वनडे सामना 2013 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कोची येथे खेळला होता. आता वेस्ट इंडिजविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला संधी मिळाली आहे. आजच्या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी न मिळाल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर याच कारणामुळे कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) ट्रोल होताना दिसतोय.