मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील टीम किंग्स इलेवन पंजाबने येणाऱ्या सीजनमध्ये अश्वीनला कर्णधार बनवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यांच्या नेतृत्वात पंजाबची टीम आयपीएल 2018 खेळणार आहे. अश्विनच्या हातात टीमची धुरा का देण्यात आली याबाबत किंग्स इलेवन पंजाबचा मेंटर वीरेंद्र सेहवागने एका फेसबूक लाईव्हमध्ये याबाबत खुलासा केला आहे.


वीरेंद्र सेहवागने म्हटलं की, 'कर्णधारपदासाठी युवराजच्या नावाची पण चर्चा होती. पण टीम मॅनेजमेंटने लांबचा विचार करता अश्विनच्या नावावर सहमती दर्शवली. सेहवागने म्हटलं की, तो नेहमी कोणत्या बॉलरला कर्णधार बनवण्याचा विचार करत होता. त्यांचं असं म्हणणं आहे गोलंदाज हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो.'


सेहवागने म्हटलं की, 'मला नेहमी असं वाटतं की, कोणत्या बॉलरला संघाचा कर्णधाप बनवलं गेलं पाहिजे. मी वसीम अकरम, वकार यूनिस आणि कपिल देव य़ांचा मोठा फॅन आहे. हे सगळे बॉलर होते. ज्यानी त्यांच्या नेतृत्वात आपल्या संघाला मोठं यश मिळवून दिलं. अश्वीन या सीजनमध्ये कमाल करेल. अश्वीन खूप स्मार्ट बॉलर आहे. टी20 सामना तो खूप चांगल्या प्रकारे समजतो'