Mahendra Singh Dhoni: भारतात घरच्या मैदानावर 2011 विश्वचषकचा अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंकामध्ये (IND vs SL) खेळवण्यात आला होता. अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) नेहमीपेक्षा लवकर फलंदाजीला आला आणि यामुळे त्याच्यावर क्रेडिट मिळवण्यासाठी लवकर फलंदाजीला आल्याचा आरोप केला जातो. गंभीरच्या आरोपानंतर धोनीवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत होती. अशातच धोनी फॅन्सने धोनीचा एक जुना व्हिडिओ (Viral Video) तुफान शेअर करण्यास सुरूवात केली आहे. एका पत्रकार परिषदेत महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) हा प्रश्न विचारण्यात आला होता.


काय म्हणाला धोनी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यावेळी विकेट पडली तेव्हा गंभीर खेळत होता आणि बॉलिंगसाठी मुरलीधरनला पाठवण्यात आलं होतं. श्रीलंकाच्या गोलंदाजांसोबत मी आयपीएलमध्ये खेळलो होतो. त्यामुळे मी त्यांच्या गोलंदाजीला चांगला समजू शकतो म्हणून मी लवकर आलो हे एक कारण आहेत, असं धोनी (Mahendra Singh Dhoni) म्हणालाय.


पाहा Video



सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग लवकर बाद झाले. विराट कोहली बाद झाल्यानंतर मैदानात गंभीर पाय रोऊन उभा होता. त्याचवेळी धोनीने एन्ट्री मारली. युवराजच्या आधी धोनी आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. युवराज सर्वात चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने पाकडे असो वा कांगारू, युवराजने सर्वांची टाय टाय फिश केली होती. मात्र, धोनी आल्याने काहीजण नाखूश देखील झाले होते. मात्र, धोनीने सामना खेचला आणि अखेर युवीने भारताला विजयाच्या शिखरावर पोहोचवलं होतं.


आणखी वाचा -  Sachin Tendulkar: 'बाबा तुमची आठवण येतीये..', वडिलांच्या आठवणीत क्रिकेटचा देव झाला भावूक!


दरम्यान, युवराज असता तर त्याला मुरलीधरनला खेळायला जमलं नसतं का? असा सवाल देखील फॅन्सने विचारला आहे. युवराज आजारी असताना देखील फायनलच्या सामन्यात 10 ओव्हर पूर्ण करू शकतो. महत्त्वाच्या फायनल (World Cup Final 2011) सामन्यात 2 बड्या फलंदाजांना मोक्याच्या क्षणी तंबुत पाठवू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळून आणू शकतो, तर मग मुरलीधरनला का खेळू शकत नाही? असा सवाल युवराजचे चाहते विचारता दिसत आहेत. मात्र, युवराजने कधी धोनीविषयी तक्रार केली नाही, हे देखील लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. शेवटी गंभीर खरंच म्हणतो, सामना कधी एक खेळाडू जिंकून देऊ शकत नाही. जिंकतो तो संघ आणि हारतो तो संघ...