IPL 2025 : आयपीएल 2025 (IPL 2025) च्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे मेगा ऑक्शन पार पाडलं. 24 आणि 25 डिसेंबर रोजी झालेल्या या मेगा ऑक्शनमध्ये 577 पैकी 182 खेळाडूंना फ्रेंचायझींनी एकूण 639. 15 कोटी खर्च करून विकत घेतले. मुंबई इंडियन्सने ऑक्शनपूर्वी त्यांच्या 5 महत्वाच्या खेळाडूंना रिटेन केलं, यात रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांचा समावेश होता. तर इतर खेळाडूंना मात्र रिलीज करण्यात आलं होतं. रिलीज करण्यात आलेल्या काही स्टार खेळाडूंना मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फ्रेंचायझी ऑक्शनमधून पुन्हा विकत घेईल अशी शक्यता होती, मात्र तसं झालं नाही. मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये त्यांनी रिलीज केलेला स्टार विकेटकीपर फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याला खरेदी केलं नाही, परंतु त्यामागे नेमकी कोणती कारण होती याबाबत हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) काही स्टेटमेंट्स दिले आहेत. 


ईशान किशनला मुंबईने का घेतलं नाही?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार फलंदाज आणि विकेटकिपर असलेला ईशान किशन 2 कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनमध्ये उतरला होता. सुरुवातीला मुंबईने त्याच्यासाठी बोली लावली, मात्र ईशानची बोली 3.20 कोटींच्या पार गेल्यावर मुंबईने बोली लावणं बंद केलं. इतर संघ ईशानवर जास्त बोली लावत होते. अखेर सनरायजर्स हैदराबादने ईशानला 11.25 कोटींना विकत घेतले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने ईशान किशनबद्दल बोलताना म्हटले की त्याला माहित होतं की ईशानच्या कौशल्यामुळे त्याला इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात मुंबईकडे परत आणणे कठीण होईल'. 


हार्दिक एका व्हिडीओमध्ये म्हणाला की, 'ईशान हा संघाची ऊर्जा होता. जेव्हा आम्ही रिटेन करू शकलो नाही, तेव्हा त्याला ऑक्शनमध्ये खरेदी करून परत संघात आणणे कठीण जाईल याची कल्पना आम्हाला होती. कारण तो कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे हे आम्हाला माहीत होते'. मुंबईचा कर्णधार असलेला हार्दिक म्हणाला, 'ईशान संघातील सर्वांना नेहमी प्रेम द्यायचा. आम्ही त्याला मिस करू. ईशान किशन, तू मुंबई इंडियन्सचा पॉकेट डायनॅमो होतास आणि आम्हा सर्वांना तुझी आठवण येईल. आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करतो.


हेही वाचा : 'हा' मुंबईकर करणार KKR चं नेतृत्व? ऑक्शनमध्ये Unsold होता होता राहिला..


 


ईशान किशन 2018 मध्ये मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. 2018 ते 2024 पर्यंत तो मुंबई इंडियन्सचा भाग होता यादरम्यान मुंबईने दोन वेळा विजेतेपदं पटकावले. ईशान किशन उत्कृष्ट विकेटकिपर असण्यासोबतच मुंबई इंडियन्सचा मॅच विनर सुद्धा राहिला. त्याने अत्यंत कठीण परिस्थिती असताना मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला होता. 


आयपीएल 2025 मुंबई इंडियन्सचा संघ : 


जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट , नमन धीर , रॉबिन मिंज , कर्ण शर्मा  , रायन रिकेल्टन , दीपक चहर , अल्लाह गझनफर , विल जॅक्स, अश्वनी कुमार , मिशेल सँटनर, रीस टोपले , कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू , बेव्हॉन जेकब्स , अर्जुन तेंडुलकर , लिझाद विल्यम्स, विघ्नेश पुथूर .