Sourav Ganguly Birthday Special: गोऱ्या साहेबांना एकदम टापटीप लागतं म्हणून सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी लुंगी घालून लॉर्ड्सवर केलेलं बंड सर्वांना आठवत असेल अन् दुसरं म्हणजे शर्ट काढून गरागरा फिरवणारा सौरव गांगुली (Sourav Ganguly). याच सौरव गांगुलीचा आज वाढदिवस (Birthday) आहे. सौरव गांगुली आज 51 वा वाढदिवस साजरा करतोय. एक काळ असा होता, जेव्हा सौरव गांगुलीच्या करियरमधील सर्वात कढीण काळ सुरू होता. त्यावेळी सौरव गांगुलीने वडिलांचा सल्ला ऐकला असता तर भलतंच घडल्याचं पहायला मिळालं असतं. सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात बोलताना हा किस्सा सांगितला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव गांगुलीला त्याच्या कारकिर्दीत एक मोठा धक्का सहन करावा लागला होता. सौरव गांगुलीला टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचा (Indian Captain) राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्याला टीममध्ये देखील संधी देण्यात येत नव्हती. सौरव गांगुलीसाठी हा संघर्षाचा काळ होता. संघातील स्थान देखील गमावल्याने गांगुली खचून गेला होता. त्यावेळी त्याच्या वडिलांना त्याचं दु:ख पहावलं नाही. त्यावेळीचा किस्सा गांगुलीने सांगितला, "मी एका रविवारी असाच घरी बसलो होते. त्यावेळी वडील माझ्याजवळ आले आणि म्हणाले तू खूप क्रिकेट खेळला आहेस. तू भारताकडून जवळपास 350 सामने खेळला आहेस. तुला अजून एक सामना खेळण्याची संधी मिळाली नाही तरी काही फरक पडणार नाही. तू जे काही मिळवलंय ते भारतीय क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलंय."


जॉनी बेअरस्टोने शिकवला कांगारूंना धडा, क्रीजवर असं काही केलं की... कॅरी सुद्धा खदाखदा हसला; पाहा Video


वडील चार दिवसांनी परत माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तू काय ठरवलं आहेस? त्यावेळी दिवसेंदिवस माझ्या हातातून संधी जात असल्याचं दिसत होतं. त्यावेळी मी फक्त 34-35 वर्षांचा होतो. माझ्या हातात अजून 4 ते 5 वर्ष बाकी होती. मी त्यानंतर टीममध्ये पुन्हा स्थान मिळवलं आणि शेवटची तीन चार वर्षे सर्वात चांगली फलंदाजी केली. त्यावेळी सचिन तेंडूलकरने देखील सौरव गांगुलीचं कौतूक केलं होतं.


पाहा Video



दरम्यान, माझा लाडका मित्र सचिन तेंडुलकर माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, सौरव माझ्या मते, मी तुला याच वर्षात सर्वोत्तम क्रिकेट खेळताना पाहिलं, असंही सौरव गांगुली म्हणाताना दिसतोय. त्यानंतर सौरव गांगुलीने मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या खेळात तो रुबाब नेहमी दिसत राहिला. प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून ओळख असलेल्या दादाने लॉर्ड्सवर बंड केलं आणि रॉयल बेंगाल टायगरची दादागिरी दाखवली.