मुंबई : लखनऊ टीमला सर्वात मोठा धक्का बसला कारण जिंकत आलेला सामना शेवटच्या ओव्हरमध्ये गमवण्याची वेळ आली. वेळ कधी बदलेलं याचं गणित कोणालाच सांगता येत नाही याचं ही मॅच उत्तम उदाहरण होती. शेवटच्या 3 बॉलमध्ये अख्खा गेम फिरला. लखनऊचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणार स्टार खेळाडू मात्र मागे राहिला. यावरून अनेक चाहते के एल राहुलवर संतापले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊच्या स्टार खेळाडूला 8 व्य़ा क्रमांकावर पाठवण्यामागचं कारण के एल राहुलने अखेर सांगितलं. 'आमच्याकडे उत्तम फलंदाजी करणारे अनेक खेळाडू आहेत. पण कठीण काळात टीमला वाचवणारा खेळाडू स्टोइनिस आहे. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने टीमला वाचवण्याचा प्रयत्नही केला. 


'स्टोइनिसच्या 3 धावा कमी पडल्या नाहीतर सामना जिंकणं आमच्या हातात होतं. स्टोइनिसने 18 बॉलमध्ये 38 धावा केल्या. त्याचं अर्धशतक हुकलं. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करत होतो. मात्र शेवटच्या वेळी थोडी गडबड झाली. स्टोइनिसने प्रयत्न केले. 


'राजस्थानने 3 धावांनी रोमांचक विजय मिळवला. त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत जे कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतात. त्यांच्याकडे हे कौशल्य आहे. 


आयपीएलच्या या सामन्यात राजस्थानने 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या म्हणत या प्रश्नावर के एल राहुलने अखेर मौन सोडलं आणि उत्तर दिलं.  राजस्थान विरुद्ध सामन्यात लखनऊचा अवघ्या 3 धावांनी पराभव झाला. के एल राहुलने राजस्थान टीममधील खेळाडूंचं कौतुकही केलं.