मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, किंग कोहली, फिटनेस फ्रिक कोहली यासोबतच कोहलीला चिकू या नावानेही ओळखलं जातं. क्रिकेटच्या मैदानात विराट कोहलीला अनेक सीनियर्स चिकू याच नावाने हाक मारायचे. महेंद्र सिंह धोनीने स्टम्प माइक मधून हे नाव उच्चारलं आणि जगाला हे नाव कळलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीचं चिकू हे नाव जरी जगभर प्रसिद्ध करण्यात महेंद्रसिंह धोनी यांच्या स्टम्प माइकमधील आवाजाचा वाटा असला तरी चिकू हे नाव विराट कोहलीला कसं पडलं यामागे एक खास किस्सा आहे. विराट कोहलीनं हा किस्सा इन्स्टाग्राम चॅटमध्ये केविन पीटरसन यांच्यासोबत बोलताना सांगितला होता. 


टीम इंडियातल्या क्रिकेटरच्या त्या बॅटला एवढा स्ट्रोक होता? ३७ चेंडूत आफ्रीदीने त्यावर शतक ठोकलं


धोनीभाई स्टम्पमागून चिकू चिकू नावाने ओरडायचा त्यामुळे हे नाव जगाला कळलं. पण हे नाव मला रणजी ट्रॉफीदरम्यान पडलं. माझे कान खूप मोठे आहेत. त्यावेळी मी हेल्दी आणि थोडा जाड होतो त्यामुळे गालही वर होते. केस गळतात या भीतीनं मी माझे केस खूप बारिक केले. त्यावेळी चंपक मासिक खूप प्रसिद्ध होता. त्यामध्ये मोठे कान असलेल्या सशाचं नाव चिकू होतं. त्यावरून मला स्टेट टीमच्या कोचने चिकू हे नाव दिलं आणि पुढे तेच प्रचलित झालं. 


किंग कोहली जगभरात आपल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे प्रसिद्ध आहे. 18 ते 22 जून दरम्यान विराटसेना न्यूझीलंडविरुद्ध WTCचा अंतिम सामना खेळणार आहे. विराट कोहली जगभरातील एकमेव असा खेळाडू आहे ज्याने ICC टूर्नामेंटचे सर्व फायनल्स खेळला आहे.