टीम इंडियातल्या क्रिकेटरच्या त्या बॅटला एवढा स्ट्रोक होता? ३७ चेंडूत आफ्रीदीने त्यावर शतक ठोकलं

शाहीद आफ्रीदीने ३७ चेंडूत शतक ठोकलं होतं, पण बॅट टीम इंडियातल्या या बेस्ट क्रिकेटरची होती...  

Updated: May 15, 2021, 04:27 PM IST
टीम इंडियातल्या क्रिकेटरच्या त्या बॅटला एवढा स्ट्रोक होता? ३७ चेंडूत आफ्रीदीने त्यावर शतक ठोकलं  title=

मुंबई: क्रिकेट विश्वात अनेक मजेशीर गोष्टी घडत असतात. असाच एक किस्सा माजी पाकिस्तानी ऑलराऊंडर शाहिद अफरीदीचा आहे. त्याने ज्या बॅटने शतक ठोकली ती बॅट टीम इंडियातील एका स्टार फलंदाजाची बॅट होती. आता प्रश्न पडेल अरे असं कसं? पण हो असं घडलंय हा नेमका प्रकार काय होता जाणून घेऊया. 

1996 मध्ये पाकिस्ताच्या ए टीमकडून शाहिद अफरीदी खेळत होते. मुश्ताक अहमदला दुखापत झाल्यामुळे श्रीलंकेविरुद्ध सामना खेळण्याची संधी अफरीदीला मिळाली होती. त्यावेळी अफरीदी तिसऱ्या क्रमांकावर उतरला आणि त्याने सगळ्यांनाह आश्चर्याचा मोठा धक्का दिला. 

अफरीदीने 11 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 37 चेंडूमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीनं शतक ठोकलं. 40 चेंडूमध्ये त्याने 104 धावा केल्या. त्याचा सर्वात जलद शतक करण्याचा रेकॉर्ड 2014 पर्यंत कायम होता. त्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूनं तो मोडून काढला. 

सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे हे शतक ज्या बॅटनं ठोकलं ती बॅट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची होती. त्याचं झालं असं की अफरीदी सोबत पाकिस्ताचा माजी खेळाडू अजहर महमूद याने देखील डेब्यू केलं होतं. अजहर महमूदने याबाबत खुलासा केला होता. 

महमूद म्हणाला की, “दुसर्‍या दिवशी जेव्हा आम्ही श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी गेलो होतो तेव्हा अफरीदी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला जात असल्याचे सांगण्यात आलं. सचिन तेंडुलकरने वकार यूनिसला भेट म्हणून आपली बॅट त्यावेळी शाहिदने घेतली आणि त्याने फलंदाजी करत आपलं शतक ठोकलं.''