कराची :  पाकिस्तानी ऑफ स्पिनर सईद अजमलला गेली ५ वर्ष एक गोष्ट सलते आहे. वर्ल्ड कप २०११ च्या सेमीफायनलमध्ये अम्पायरने सचिन तेंडुलकरला नॉट आऊट दिले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजमल तेव्हा बॉलिंग करत होता. अम्पायरने असा निर्णय का दिला हे मला आजही समजले नसल्याचे अजमल सांगतो. 


आऊट का दिले नाही ?


४० वर्षाच्या अजमलने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मोहालीमध्ये पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात तेंडुलकरने ८५ रन्स बनविले होते. दरम्यान अजमलने त्याला बाद केले.


सचिन बाद असल्याचा मला विश्वास होता. पण अम्पायरने त्याला आऊट का नाही दिले ? हे मला कळाले नसल्याचे विधान अजमलने नुकतेच केले आहे. 


भारतीयांना बॉलिंग करणे आव्हान


भारतीय बॅट्समन्सना बॉलिंग करणे हे सोपे कधीच नव्हते, तेंडुलकर आणि कंपनीला बॉलिंग करणे हे कौशल्या, क्षमता पणाला लावण्यासारखेच असल्याचे त्याने सांगितले. 
 
  


आयसीसीशी नाराज


 पाकचा अनुभवी स्पिनर सईद अजमलने जड अंतकरणाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याच्या बॉलिंग अॅक्शन 'आयसीसी प्रोटोकॉल' नुसार  घेतल्या गेलेल्या आक्षेपावर नाराजी व्यक्त केली. आपल्या यशस्वी आणि वादग्रस्त कारकिर्दीत त्याने ३५ टेस्टमध्ये १७८ विकेट घेतले. 


बॉलिंगवर आक्षेप


 २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मॅचमध्ये त्याच्या बॉलिंग एक्शनवर पहिल्यांदा आक्षेप घेण्यात आला होता.


२०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याच्या बॉलिंगविरुद्ध पुन्हा आक्षेप घेण्यात आला. 


अजमलची खंत 


माझ्या बॉलिंग अॅक्शनला अवैध ठरविले गेल्यानंतर बोर्डने माझी साथ दिली.


पण आयसीसीसमोर या प्रोटोकॉलला आव्हान देत माझी बाजू मांडता आली असती अशी खंतही त्याने जाताजाता व्यक्त केली आहे.